किरकोळ कारणातून एकास मारहाण
By Admin | Updated: June 2, 2014 17:57 IST2014-06-02T17:56:29+5:302014-06-02T17:57:28+5:30
वाहनाचे नुकसान केल्याच्या कारणावरून पाच जणांनी एकास बेदम मारहाण केल्याची घटना नंदुरबारात घडली.

किरकोळ कारणातून एकास मारहाण
नंदुरबार :वाहनाचे नुकसान केल्याच्या कारणावरून पाच जणांनी एकास बेदम मारहाण केल्याची घटना नंदुरबारात घडली.
पोलीस सूत्रांनुसार, कुरेशी मोहल्ला भागात वाहन मागे घेताना दुचाकीला धक्का लागला. त्या कारणावरून युसूफ खाँ, युनूस खाँ, अनिस खाँ, शेख युसूफखाँ, सुलतान खाँ यांनी नसीरखाँ कुरेशी व त्यांच्या दोन्ही मुलांना लाकडी फळी व लोखंडी सळईने मारहाण केली. पोलीस ठाण्याबाहेर अनिस खाँ याने जुबेरवर लोखंडी दामनने वार केले. रशिदाबी कुरेशी यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.