शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

खाकीतील सिक्रेटसुपरस्टारवर गायनासह, अभिनयासाठी ऑफर्ससचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 13:29 IST

व्हिडीओमुळे पोलीस संघपाल तायडे देशभर चर्चेत

ठळक मुद्देचित्रपटात गायक, अभिनेता म्हणून करणार काममराठी, हिंदी चित्रपटात अभिनेता म्हणून झळकणार  

किशोर पाटील / ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 19-   सोशल मीडियावर त्या गाण्याच्या व्हिडीओतून आपल्या आवाजाने अख्या देशाला भुरळ घालणा:या खाकीतील सिक्रेटसुपरस्टार संघपाल राजाराम तायडे या पोलीस कर्मचा:याला अनेक हिंदी, मराठी चित्रपटात, गायक तसेच अभिनेता म्हणून काम करण्यासाठी ऑफर्सचा अक्षरक्षा पाऊस पडत आह़े आगामी काळात हिंदी, मराठी चित्रपटातून तायडे गायकासह, अभिनेता म्हणून काम करणार असून लवकरच एका प्रसिध्द माध्यमावर रिअॅलीटी शोमध्ये प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आह़े  जिल्हा पोलीस दलातील पोलीस नाईक तथा गायक संघपाल तायडे यांनी लोकमतच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली़ यावेळी लोकमतने त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी मोकळेपणाने चर्चा करत गायनासह जीवनातील तसेच भविष्यातील वाटचालीवर प्रकाश टाकला़ यावेळी त्यांच्या सोबत त्यांचे सहकारी राजेंद्र तायडे उपस्थित होत़े  

 युध्द जिंकून घरी परतलेल्या सैनिकाप्रमाणे गावात आनंदोत्सव  गाण्याच्या फेसबुकवरील व्हिडीओला अल्पावधीत लाखो लाईक मिळाल्या़ यानंतर हिंदी, मराठी, इंग्रजी सर्वच प्रसारमाध्यमांचे मुलाखतीसाठी फोन आल़े सर्वाना वेळ कसा द्यायचा, हा प्रश्न माङयासमोर होता़ सर्व माध्यमांना वेळ देवून वाकोदला गावाकडे परतलो़ गावात एखाद्या युध्द जिंकून परतलेल्या सैनिकाप्रमाणे प्रत्येक घरोघरी औक्षण झाल़े ढोल-ताशांचा गजर अशा जल्लोषपूर्ण वातावरणात घरी पोहचलो़ यामुळे ग्रामथांचे नेहमीच सहकार्य राहिले, त्यांच्या आपल्यावरील प्रेमाने खूपच भारावलो होतो़ क्षण अविस्मरणीय असाच हा क्षण असल्याचेही तायडे यांनी सांगितल़े  ऑडीशन गेलो होता़़़आता अतिथी म्हणून जाणार  लहानपणापासून गायनाची आवड होती़ त्याप्रमाणे कुठलाही क्लास न लावता, डय़ुटी सांभाळून वेळ मिळेल तेव्हा गाणे म्हणायचो़ यादरम्यान टिव्ही वरील काही कार्यक्रमांसाठी ऑडीशनही द्यायला होतो़ मात्र त्यावेळी पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नव्हता़ आता त्याच सारेगमप रिअॅलीटी शोमध्ये अतिथि म्हणून उपस्थित राहण्यासाठी फोन आल्याचे तायडे यांनी सांगितल़े   

मराठी, हिंदी चित्रपटात अभिनेता म्हणून झळकणार  आगामी काळात साईधन प्रोडक्शनची निर्मिती सस्पेन्स हाऊस या हिंदी चित्रपटात अभिनेता मुख्य भूमिका साकारणार आह़े याच चित्रपटात सेल्फी रे हे गाणेही म्हणणार आह़े याच प्रोडक्शनच्यानिर्मिती असलेल्या साईबाबांवरील साईशरण अल्बममध्येही सर्व गाणे म्हणण्याची संधी मिळाली असून लवकरच तो अल्बम प्रदर्शित होणार आह़े तसेच दुष्काळ या मराठी चित्रपटात मुख्य भुमिकेत असून तू ये रे पाऊसा हे भावनिक गाणे म्हणणार आह़े प्रदर्शनाला उशीर असल्याने खास शेतक:यांसाठी हे गाणे चित्रपटापूर्वी प्रदर्शित करणार असल्याचेही तायडे यांनी सांगितल़े यासह बीबीसीसह सर्व हिंदी, मराठी, इंग्रजी माध्यमांमध्ये मुलाखतींचा अनुभव त्यांनी सांगितला़ यावेळी अनेकांनी माङया सोबत सेल्फी काढल्याने सुखद क्षण अनुभवायला मिळाल्याचेही ते म्हणाल़े