शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पावडरच्या डब्यात सीमकार्ड टाकणारा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 20:27 IST

बंदी पलायन प्रकरण : दुचाकीही जप्त

जळगाव : कारागृहातून पलायन करण्यापूर्वी बंदी ज्या मोबाईलवरुन बोलत होते, त्यातील सीमकार्ड कारागृहात पोहचविण्यासाठी मदत करणाऱ्या सागर उर्फ कमलाकर सुभाष पाटील (२४, रा.तांबापुरा, अमळनेर) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी अटक केली. सागर उर्फ कमलाकर पाटील यानेच सीमकार्ड घेऊन पावडरच्या डब्यात टाकले व तो डबा आणि हे साहित्य पोहचविण्यासाठी दुचाकी नागेश पिंगळेला दिली होती, असेही तपासात निष्पन्न झाले आहे.दरम्यान, या गुन्ह्यात ११ जणांना आरोपी करण्यात आलेले असून त्यापैकी ८ जणांना अटक करण्यात आली आहे. मुख्य संशयित सुशील मगरेसह इतर दोन अशा तिघांना अद्याप अटक झालेली नाही. या गुन्ह्याचा तपास अतिशय वेगाने होत असून त्यात पोलिसांना यशही मिळत आहे. सीमकार्डच्याबाबत सखोल तपासाच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांना दिल्या होत्या. त्यानुसार चौकशी सागर उर्फ कमलाकर हा निष्पन्न झाला होता. सहायक फौजदार नारायण पाटील, हवालदार रामचंद्र बोरसे, मनोज दुसाने, दीपक शिंदे, प्रवीण हिवराळे यांच्यासह सहायक फौजदार विजय पाटील, दत्तात्रय बडगुजर, नरेंद्र वारुळे व किरण चौधरी यांनीच सागरला निष्पन्न करुन अमळनेरातून अटक केली. गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही जप्त करण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव