चांदी पुन्हा चार हजार रुपयांनी वधारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:40 IST2021-01-13T04:40:38+5:302021-01-13T04:40:38+5:30

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या भावात चढ-उतार सुरूच असून तीन दिवसांत सात हजार ३०० रुपयांनी घसरण झालेल्या चांदीच्या ...

Silver rose again by Rs 4,000 | चांदी पुन्हा चार हजार रुपयांनी वधारली

चांदी पुन्हा चार हजार रुपयांनी वधारली

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या भावात चढ-उतार सुरूच असून तीन दिवसांत सात हजार ३०० रुपयांनी घसरण झालेल्या चांदीच्या भावात मंगळवार, १२ जानेवारी रोजी चार हजार रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे चांदी ६७ हजार रुपये प्रति किलोवर तर सोन्याच्याही भावात ३०० रुपयांनी वाढ होऊन ते ५० हजार ४०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले.

९ जानेवारी रोजी पाच हजार ८०० रुपयांनी व ११ रोजी एक हजार ५०० रुपयांनी घसरण होऊन ६३ हजार रुपयांवर आलेल्या चांदीच्या भावात मंगळवार, १२ रोजी पुन्हा चार हजार रुपयांनी वाढ होऊन चांदी ६७ हजार रुपयांवर पोहचली. अशाच प्रकारे ९ रोजी एक हजार रुपयांनी घसरण व ११ रोजी ५०० रुपयांनी घसरण होऊन ५० हजार १०० रुपयांवर आलेल्या सोन्याच्याही भावात मंगळवार, १२ रोजी ३०० रुपयांनी वाढ होऊन ते ५० हजार ४०० रुपयांवर पोहचले.

नवीन वर्षाच्या सुरुवातीला १ जानेवारी रोजी ६९ हजार रुपयांवर असलेली चांदी ५ जानेवारीपर्यंत ७१ हजार ५०० रुपयांवर पोहचली होती. त्यानंतर मात्र भाव कमी-कमी होत गेले होते. तसेच सोन्यातही ५ जानेवारीपर्यंत एक हजार २०० रुपयांनी वाढ होत जाऊन ते ५२ हजार ४०० रुपयांवर पोहचले होते. मात्र त्यातही घसरण होत गेली व मंगळवारी पुन्हा ३०० रुपयांनी वाढ झाली.

Web Title: Silver rose again by Rs 4,000