शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
4
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
5
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
6
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
7
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
8
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
9
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
10
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
11
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
12
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
13
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
14
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
15
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
16
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
17
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
18
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
19
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
20
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?

एकाच दिवसात चांदीत ३५०० रुपयांनी घसरण; ‘कोरोना’मुळे अस्थिरता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2020 06:41 IST

शनिवारी तर एकाच दिवसात चांदीच्या भावात तब्बल साडे तीन हजार रुपयांनी घसरण होऊन ती ४५ हजार ५०० रुपयांवरून ४२ हजार रुपये प्रती किलोवर आली.

- विजयकुमार सैतवालजळगाव - कोरोना व्हायरसची व्याप्ती वाढण्यासह सराफ बाजारावरही त्याचा परिणाम वाढतच आहे. औद्योगिक आयात-निर्यात थांबून सोने-चांदीच्या भावात दररोज घसरण होत आहे. यात शनिवारी तर एकाच दिवसात चांदीच्या भावात तब्बल साडे तीन हजार रुपयांनी घसरण होऊन ती ४५ हजार ५०० रुपयांवरून ४२ हजार रुपये प्रती किलोवर आली. तर सोन्याच्या भावात ६०० रुपयांनी घसरण होऊन ते ४२ हजार २०० रुपयांवरून ४१ हजार ६०० रुपये प्रती तोळ््यावर आले.गेल्या तीन दिवसात सोने २८०० रुपये प्रती तोळा तर चांदी साडे पाच हजार रुपये प्रती किलोने घसरली आहे. कोरोनामुळे जागतिक बाजारपेठेत सोने-चांदीची औद्योगिक मागणी घटल्याने त्यांचे भाव कमी-कमी होत आहे. अमेरिका, इंग्लंडमधून आयात होणाऱ्या या धातूंच्या भावावर वेगवेगळ््या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा नेहमी प्रभाव जाणवतो. त्यात आता तर चीनमधून जगभर हातपाय पसरवित असलेल्या कोरोनाने इंधन, शेअर बाजार यांच्यावर मोठा परिणाम होत आहे. त्यातून विदेशातून येणारे सोने-चांदीदेखील सुटत नसल्याचे चित्र सध्या बाजारात आहे.आंतरराष्ट्रीय पातळीवरच या धातूंची मागणी घटल्याने  अमेरिका व इंग्लंडमधून सोने-चांदी निर्यात होणे व इतर देशात त्यांची आयात होण्याचे प्रमाण कमी-कमी होत आहे. परिणामी मागणी घटल्याने त्यांचे भाव कमी होत आहे.सर्वात मोठी घसरणहे भाव कमी होत असताना शनिवार, १४ मार्च रोजी तर चांदीच्या भावात सर्वात मोठी घसरण झाली. १३ मार्च रोजी ४५ हजार ५०० रुपयांवर असलेल्या चांदीच्या भावात थेट ३५०० रुपयांनी घसरण होऊन ती थेट ४२ हजार रुपये प्रती किलोवर आली. या पूर्वी २९ फेब्रुवारी रोजी चांदीत २५०० रुपयांनी घसरण झाली होती. त्यानंतर तिचे भाव कमी-कमी होत गेले व आता शनिवारी ऐतिहासिक घसरण झाली. अशाच प्रकारे सोन्याच्या भावातही शनिवारी ६०० रुपये प्रती तोळ््याने घसरण झाली. गेल्या तीन दिवसांची स्थिती पाहिली तर सोने २८०० रुपये प्रती तोळा तर चांदी साडे पाच हजार रुपये प्रती किलोने घसरली आहे.जागतिक पातळीवर सोने-चांदीची औद्योगिक आयात-निर्यात थांबून भाव कमी-कमी होत आहे. - अजयकुमार ललवाणी,अध्यक्ष, जळगाव शहर सराफ असोसिएशन, जळगाव.

टॅग्स :JalgaonजळगावSilverचांदी