दुसऱ्या दिवशीही चांदीत घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:15 IST2021-03-28T04:15:24+5:302021-03-28T04:15:24+5:30
जळगाव : शुक्रवारी ६०० रुपयांनी घसरण झालेल्या चांदीच्या भावात शनिवारी पुन्हा शंभर रुपयांची घसरण होऊन चांदी ६५ हजार ६०० ...

दुसऱ्या दिवशीही चांदीत घसरण
जळगाव : शुक्रवारी ६०० रुपयांनी घसरण झालेल्या चांदीच्या भावात शनिवारी पुन्हा शंभर रुपयांची घसरण होऊन चांदी ६५ हजार ६०० रुपयांवर आली. दुसरीकडे सोन्यात मात्र शंभर रुपयांनी वाढ होऊन ते ४५ हजार ७०० रुपयांवर पोहोचले.
गेल्या अनेक दिवसांपासून चढ उतार होत असलेल्या सोने-चांदीच्या भावात गुरुवार व शुक्रवार असे सलग दोन दिवस घसरण होऊन या दोन दिवसात चांदी एक हजार ८०० रुपयांनी घसरली होती. त्यामुळे चांदीचे भाव ६५ हजार ७०० रुपये प्रति किलोवर आले होते. अडीच महिन्यानंतर चांदीचे भाव पुन्हा ६६ हजार रुपयांच्या खाली आल्यानंतर शनिवारी पुन्हा शंभर रुपयाची घसरण झाली. शुक्रवारी सोन्याच्या भावात २०० रुपयांनी घसरण होऊन ते ४५ हजार ६०० रुपये प्रति तोळ्यावर आले होते. मात्र शनिवारी त्यात शंभर रुपयांची वाढ होऊन ते ४५ हजार ७०० रुपयांवर पोहोचले.