अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार प्रकरणी जळगावात निघाला मूक मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2022 13:08 IST2022-02-24T13:08:27+5:302022-02-24T13:08:31+5:30
धरणगाव येथे अल्पवयीन चिमुरडींवर एका ६२ वर्षांच्या नराधमाने अत्याचार केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती.

अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार प्रकरणी जळगावात निघाला मूक मोर्चा
जळगाव - अल्पवयीन चिमुरडींवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी, म्हणून जळगावात आज मूक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात समाजातील सर्व मान्यवरांनी एकत्र येत घटनेचा निषेध केला. शिवतीर्थ मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला होता.
धरणगाव येथे अल्पवयीन चिमुरडींवर एका ६२ वर्षांच्या नराधमाने अत्याचार केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. याच घटनेच्या निषेधार्थ काढण्यात मोर्चा काढला. या मोर्चावेळी अल्पवयीन चिमुरडींवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. या मोर्चात भाजप आमदार सुरेश भोळे, महापौर जयश्री महाजन यांनीही सहभाग घेतला होता.