सिग्नेचर या लघुपटाची आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:12 IST2021-07-18T04:12:51+5:302021-07-18T04:12:51+5:30
रावेर : येथील मूळ रहिवासी अंकित अग्रवाल याने लेखन, संपादन व दिग्दर्शित केलेल्या ‘सिग्नेचर’ या लघुपटाने ‘गोल्डन ...

सिग्नेचर या लघुपटाची आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बाजी
रावेर : येथील मूळ रहिवासी अंकित अग्रवाल याने लेखन, संपादन व दिग्दर्शित केलेल्या ‘सिग्नेचर’ या लघुपटाने ‘गोल्डन स्पॅरो’ या आंतरराष्ट्रीय
चित्रपट महोत्सवात बाजी मारली आहे. यामुळे रावेर शहराच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला आहे.
या लघुपटात एका ग्रामीण भागातील अशिक्षित महिलेच्या जीवनावर हा लघुपट चितारण्यात आला आहे.
हा लघुपट हिंदीत आहे. त्याची निर्मिती अग्रवाल ज्वेलर्सचे संचालक संजय अग्रवाल व त्यांची पत्नी किरण अग्रवाल यांनी केले आहे. चित्रीकरण अजिंक्य जैन यांनी केले आहे. लघुपटात प्रतिभा विश्वकर्मा (भारतेंदु नाट्य अकादमी, लखनऊ), आर्या चौधरी (श्रीराम मॅक्रो व्हिजन ॲकॅडमी,रावेर) हे मुख्य भूमिकेत आहेत. तसेच लखन महाजन आणि वंदना पाटील हे सहकलाकार आहेत.
चित्रीकरण करताना जि.प. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, दिलीप पाटील, नगरसेवक ॲड. सूरज चौधरी, गोविंद अग्रवाल, अभिषेक दहाळे, युवराज माळी, मनोज लोहार, केदार सातव, यश सोनार, जयेश वसंत पाटील, यश कोंगे, यश सोनार, संकेत पाटील (मोरगाव), साईकत मुजुमदार (भुसावळ) व मतीन नुरी यांचे अनमोल सहकार्य लाभले.
चौकट
- अंकित याने मुंबईच्या व्हिसलिंग वुड इंटरनॅशनल या सिने महाविद्यालयात चित्रपट निर्मितीची पदवी प्राप्त केली. त्याने आजपावेतो ‘पाखरं’ हे लघुपटलेखन, संपादन व दिग्दर्शन केले असून तीन आंतरराष्ट्रीय सिने महोत्सवात तीन वेळा त्या लघुपटाची निवड झाली आहे. युट्यूबवर व्हॅलेन्टाईन्स मिडले २०२१ या लघुपटाला ५ लाख दर्शक लाभले आहेत. आता सिग्नेचर या लघुपटाची सर्वोत्कृष्ट भारतीय लघुपट पुरस्कारांसाठी निवड झाली आहे.
कोट
मित्रांसोबत रोज व्हिडिओ कॉलद्वारे संभाषण होत असताना या लघुपटाची पटकथा सुचली. सर्व कलाकारांची एक महिन्याची कार्यशाळा घेतली.
त्यामुळे त्यांना कॅमेऱ्यासमोर ॲक्टिंग कशी करावी, हे समजले. याच मेहनतीचा आज फायदा झाला आहे.
- अंकित अग्रवाल, दिग्दर्शक.