रेल्वे प्रशासनातर्फे सिग्नल यंत्रणेचे काम पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:13 IST2021-07-18T04:13:08+5:302021-07-18T04:13:08+5:30
रेल्वे प्रशासनातर्फे तिसऱ्या रेल्वे मार्गासाठी नवीन सिग्रल यंत्रणेची दुरूस्ती व नवीन सिग्नल यंत्रणा उभारणे व इतर टर्मिनेटच्या तांत्रिक कामासाठी ...

रेल्वे प्रशासनातर्फे सिग्नल यंत्रणेचे काम पूर्ण
रेल्वे प्रशासनातर्फे तिसऱ्या रेल्वे मार्गासाठी नवीन सिग्रल यंत्रणेची दुरूस्ती व नवीन सिग्नल यंत्रणा उभारणे व इतर टर्मिनेटच्या तांत्रिक कामासाठी रेल्वे प्रशासनातर्फे १६ व १७ जुलै रोजी ३४ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. या कामासाठी सुमारे २० गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. शुक्रवारी सकाळी या कामाला सुरूवात झाल्यानंतर, रेल्वे प्रशासनाने सायंकाळ पर्यंत सिंग्नल यंत्रणेचे ४० टक्के काम पूर्ण केले होते. रेल्वे स्टेशन जवळील स्वतंत्र असलेल्या सिग्नल यंत्रणेच्या इमारतीत २४ तास हे काम चालले. शनिवारी सायंकाळी सिग्नल यंत्रणेचे १०० टक्के काम पूर्ण झाले असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. दरम्यान, रद्द झालेल्या गाड्या या रविवार पासून पूर्ववत होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली.