राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी श्यामसिंग परदेशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:22 IST2021-08-17T04:22:53+5:302021-08-17T04:22:53+5:30

जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांच्या स्वाक्षरीचे नियुक्तीपत्र माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या हस्ते देण्यात आले. याप्रसंगी चोसाकाचे ...

Shyamsingh Pardeshi as NCP's city president | राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी श्यामसिंग परदेशी

राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी श्यामसिंग परदेशी

जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांच्या स्वाक्षरीचे नियुक्तीपत्र माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या हस्ते देण्यात आले. याप्रसंगी चोसाकाचे माजी चेअरमन ॲड. घनश्याम पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गोरखतात्या पाटील, माजी शिक्षक आमदार दिलीपराव सोनवणे, चोपडा पीपल्स बँकेचे अध्यक्ष चंद्रहास गुजराथी, उपाध्यक्ष प्रवीण गुजराथी, अजगर अली सय्यद अली, नगराध्यक्षा मनीषा चौधरी, उपनगराध्यक्ष भूपेंद्र गुजराथी, गटनेते जीवन चौधरी, बांधकाम सभापती रमेश शिंदे, नगरसेवक हितेंद्र देशमुख, हुसेन खाँ पठाण, एहसानअली सय्यद, अकील जहागीरदार, दीपाली चौधरी, वसंत सोनार, कैलास सोनवणे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब पाटील, चोसाका चेअरमन अतुल ठाकरे, संचालक सुनील महाजन, आनंदराव रायसिंग, शेखर पाटील, नीलेश पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दिनकर देशमुख, जिल्हा परिषद सदस्य नीलम पाटील, शेतकी संघाचे माजी प्रेसिडेंट शेखर पाटील, अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष अक्रम तेली उपस्थित होते.

१ ऑगस्ट रोजी श्यामसिंग परदेशी यांची निवड जाहीर केली होती आणि माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी त्यांचा सत्कारही केला होता. मात्र तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी श्यामसिंग परदेशी यांच्या निवडीवर नाराजी व्यक्त केली होती. त्या दिवसापासून परदेशी यांची निवड लटकली होती. मात्र अखेर त्यावर पत्र देऊन पुन्हा अरुणभाई गुजराथी यांनी शहर अध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर केले.

160821\16jal_1_16082021_12.jpg

राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी श्यामसिंग परदेशी

Web Title: Shyamsingh Pardeshi as NCP's city president