अयोध्येतील श्रीराम भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अमळनेर येथे श्रीराम महायज्ञ उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 16:54 IST2020-08-05T16:53:39+5:302020-08-05T16:54:05+5:30

भूमिपूजन सोहळ्यानिमित्ताने तसेच देश कोरोनामुक्त व्हावा व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना दीघार्युष्य लाभावे यासाठी भाजप नेत्या अ‍ॅड.ललिता पाटील यांच्या निवासस्थानी भव्य श्रीराम यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते.

Shriram Mahayagya at Amalner on the backdrop of Shriram Bhumi Pujan ceremony in Ayodhya | अयोध्येतील श्रीराम भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अमळनेर येथे श्रीराम महायज्ञ उत्साहात

अयोध्येतील श्रीराम भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अमळनेर येथे श्रीराम महायज्ञ उत्साहात

अमळनेर : गेल्या शेकडो वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या अखंड भारताचे अराध्य दैवत श्रीराम मंदिराचा भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीराम जन्मभूमी अयोध्या नगरीत आयोजीत करण्यात आले होते. यावेळी अयोध्येत श्रीराम मंदिर होण्याची स्वप्नपूर्ती होत असल्याने देशात उत्साहाचे व चैतन्याचे वातावरण होते. यानिमित्ताने या भूमिपूजन सोहळ्यानिमित्ताने तसेच देश कोरोनामुक्त व्हावा व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना दीघार्युष्य लाभावे यासाठी भाजप नेत्या अ‍ॅड.ललिता पाटील यांच्या निवासस्थानी भव्य श्रीराम यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते.
अ‍ॅड.ललिता पाटील व प्रा.श्याम पाटील यांच्या हस्ते अभिषेक आणि पूजा करण्यात आली. बाजार समिती संचालक पराग पाटील व देवेश्री पाटील यांच्या हस्ते होमहवन करण्यात आले.
यावेळी आमदार गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी आमदार स्मिता वाघ यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे कार्यक्रमाला उपस्थिती दिली. याप्रसंगी बाजार समितीचे सभापती प्रफुल्ल पाटील, सिनेट सदस्य दिनेश नाईक, भाजप तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, शहराध्यक्ष उमेश वाल्हे, भिलाली सरपंच दिनेश माळी, योगआचार्य कमलेश कुलकर्णी, बाम्हणे उपसरपंच प्रकाश पाटील, सामर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल माळी, राहुल पाटील, मनोज बिºहाडे, कुंदन माळी, पराग कोल्हे, जयंत महाजन आदी उपस्थित होते. यावेळी आचार्य सुनील मांडे, सारंग पाठक व नीलेश आसोदेकर यांनी पूजाविधी केली.

Web Title: Shriram Mahayagya at Amalner on the backdrop of Shriram Bhumi Pujan ceremony in Ayodhya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.