१३ रोजी श्री नरनारायण जन्मोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:21 IST2021-08-13T04:21:34+5:302021-08-13T04:21:34+5:30
छावा संघटनेचे अध्यक्ष आज जिल्ह्यात जळगाव - मराठा आरक्षणाबाबत ठोस भूमिकेसाठी अ. भा. छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नाना जावळेपाटील, ...

१३ रोजी श्री नरनारायण जन्मोत्सव
छावा संघटनेचे अध्यक्ष आज जिल्ह्यात
जळगाव - मराठा आरक्षणाबाबत ठोस भूमिकेसाठी अ. भा. छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नाना जावळेपाटील, हे १३ ऑगस्ट रोजी नूतन मराठा कॉलेज सभागृहात बैठक घेणार आहेत. केंद्रीय कार्याध्यक्ष भीमराव मराठे, विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे पाटील आदींची उपस्थिती राहणार आहे. उपस्थितीचे आवाहन जिल्हाध्यक्ष संतोष पाटील, राजू कुमावत, महानगराध्यक्ष नाना महाले यांनी केले आहे.
जीएम डायग्नोस्टिकतर्फे मोफत आरोग्य तपासणी
जळगाव : जीएम डायग्नोस्टिकतर्फे १ ते १५ ऑगस्टदरम्यान मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात हाडांचा ठिसूळपणा, मधुमेह, रक्तदाब तपासणी, उंची, वजन अशा तपासण्या केल्या जाणार आहे. या शिबिरात आतापर्यंत ३ हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन व्यवस्थापक नीलेश जोशी यांनी केले. आहे.