यावल येथे श्री स्वामी समर्थ केंद्रात अखंड गुरुचरित्र पारायण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 19:27 IST2018-12-16T19:25:23+5:302018-12-16T19:27:15+5:30

यावल येथील श्री स्वामी समर्थ बालसंस्कार केंद्रात दत्त जयंतीनिमित्ताने अखंड नामजप यज्ञ सप्ताहास शनिवारपासून सुरुवात झालीे. हा सप्ताह २३ डिसेंबरपर्र्यंत चालणार आहे.

At Shree Swami Samarth Kendra at the Yaval, Akhand Guruchrita Parayan | यावल येथे श्री स्वामी समर्थ केंद्रात अखंड गुरुचरित्र पारायण

यावल येथे श्री स्वामी समर्थ केंद्रात अखंड गुरुचरित्र पारायण

ठळक मुद्देश्री दत्त जयंतीनिमित्त आठवडाभर विविध कार्यक्रमश्री स्वामी समर्थ गुरुचरित्र पारायण वाचनाने सुरुवात२३ रोजी सत्यदत्त पूजन व महाआरतीने होणार

यावल, जि.जळगाव : यावल येथील श्री स्वामी समर्थ बालसंस्कार केंद्रात दत्त जयंतीनिमित्ताने अखंड नामजप यज्ञ सप्ताहास शनिवारपासून सुरुवात झालीे. हा सप्ताह २३ डिसेंबरपर्र्यंत चालणार आहे.
सप्ताहात दररोज विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. सप्ताहाची सुरुवात श्री स्वामी समर्थ ग्रंथाचे वाचन श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र पारायण वाचनाने सुरुवात झाली.
या मंगल सोहळ्यात स्वामी समर्थ सेवेकऱ्यांनी मोठ्या उत्साहात भाग घेतला आहे. कार्यक्रमात ग्रामदेवता निमंत्रण, मंडल मांडणी, देवता स्थापना, अग्निस्थापना, स्थापित देवता हवन, श्री गणेश याग, श्री मनबोध याग, श्री चंडी याग, श्री गीताई याग, श्री स्वामी याग, श्री रुद्रयाग, श्री मल्हारी याग, श्री दत्तजयंतीनिमित्ताने २२ रोजी दुपारी श्री दत्तजयंती जन्मोत्सव साजरा होईल.
२३ रोजी श्री सत्यदत्त पूजन व महाआरती सप्ताह सांगता सकाळी १०.३० वाजता महानैवेद्य आरतीने होईले. भाविकांनी या सप्ताहाचा लाभ घ्यावा, असे श्री स्वामी समर्थ केंद्रातर्फे करण्यात आले आहे.

Web Title: At Shree Swami Samarth Kendra at the Yaval, Akhand Guruchrita Parayan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.