खान्देशात शिडकावा

By Admin | Updated: November 23, 2015 00:17 IST2015-11-23T00:17:33+5:302015-11-23T00:17:33+5:30

जळगाव : खान्देशात रविवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे खरिपाच्या काढणी सुरू असलेल्या पिकांचे व कोरडय़ा चा:याचे नुकसान संभवते. वेधशाळेने खान्देशात गारपिटीचा अंदाज वर्तवला होता.

Shredding in the Canyon | खान्देशात शिडकावा

खान्देशात शिडकावा

जळगाव

.

या भागात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते

. नंदुरबार येथे सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पावसाचा शिडकावा झाला. यामुळे पथा:यांवर वाळविण्यासाठी टाकलेली मिरची झाकण्यासाठी व्यापा:यांची धावपळ उडाली. धुळे जिल्ह्यात रविवारी दुपारनंतर तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला. पिंपळनेर, साक्री, निजामपूर, जैताणे, धमनार, भामेर येथे रिमङिाम स्वरूपाचा पाऊस झाला. पाऊस रात्री उशिरार्पयत सुरू होता. धुळे शहरासह विंचूर व शिरुड येथे संध्याकाळी पाऊस सुरू झाला. शिरपूर व शिंदखेडा तालुक्यात पाऊस झाल्याचे वृत्त नाही. जळगाव शहरासह जिल्ह्यातील अमळनेर, चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल व पहूर परिसरात दुपारनंतर पावसाने हजेरी लावली.
: खान्देशातील तीनही जिल्ह्यात रविवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे खरिपाच्या काढणी सुरू असलेल्या पिकांचे व कोरडय़ा चा:याचे नुकसान संभवते. वेधशाळेने खान्देशात गारपिटीचा अंदाज वर्तवला होता

Web Title: Shredding in the Canyon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.