शॉर्ट न्यूज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:15 IST2021-01-18T04:15:06+5:302021-01-18T04:15:06+5:30

जळगाव : तालुक्यातील भादली येथील विजय ओंकार नारखेडे (५३) यांची दुचाकी (क्र.एम.एच.१९ बी.आर.०५८८) गावातून लांबविण्यात आल्याची घटना उघडकीस आली ...

Short news | शॉर्ट न्यूज

शॉर्ट न्यूज

जळगाव : तालुक्यातील भादली येथील विजय ओंकार नारखेडे (५३) यांची दुचाकी (क्र.एम.एच.१९ बी.आर.०५८८) गावातून लांबविण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रविवारी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १५ जानेवारी रोजी रात्री त्यांनी घराजवळ दुचाकी पार्कींग केली होती. दुसऱ्या दिवशी दुचाकी चोरी झाल्याचा प्रकार उघड झाला.

इच्छा देवी व काव्यरत्नावली चौकातून मोबाईल लांबविला

जळगाव : काव्यरत्नावली चौकात मित्रांसोबत थांबलेल्या विकार सैय्यद जब्बार सैय्यद (३०,रा.डी मार्टसमोर) या तरुणाचा मोबाईल चोरट्यांनी लांबविल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी रविवारी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. दरम्यान, इच्छादेवी परिसरातील रुखसाना राजू तडवी (२८) यांंचे दोन मोबाईल रात्री घरातून लांबविण्यात आले. त्यातील एक मोबाईल न्याजोद्दीन तडवी यांचा आहे. याप्रकरणी रविवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

Web Title: Short news