धक्कादायक..अल्पवयीन मुलांच्या शोषणातून मुलीला गर्भधारणा

By Admin | Updated: June 24, 2017 18:09 IST2017-06-24T18:09:35+5:302017-06-24T18:09:35+5:30

दोघा संशयितांविरूद्ध जामनेर पोलिसात बलात्काराचा गुन्हा

Shocking ... girls pregnant with the exploitation of under-age children | धक्कादायक..अल्पवयीन मुलांच्या शोषणातून मुलीला गर्भधारणा

धक्कादायक..अल्पवयीन मुलांच्या शोषणातून मुलीला गर्भधारणा

 ऑनलाईन लोकमत

जामनेर, दि.24 - जामनेर येथील एका 13 वर्षीय मुलीचे लैगिंक शोषण केल्याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांविरूद्ध जामनेर पोलीस स्टेशनला शनिवारी बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. पीडित मुलगी गर्भवती राहिल्याने हा धक्कादायक प्रकार उघड झाला.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जामनेर येथील इयत्ता सातवीत शिक्षण घेणारी 13 वर्षीय बालिकेचे त्याच भागात राहणा:या दोघांनी जानेवारी 2016 ते मार्च 2017 या दरम्यान वेळोवेळी लैगिंक शोषण केले. दोघा मुलांकडून या अल्पवयीन मुलीला गर्भधारणा राहिल्याने हा प्रकार उघड झाला. त्यानुसार पीडित मुलीच्या आईने शनिवारी जामनेर पोलीस स्टेशन गाठत दोघा अल्पवयीन मुलांविरुद्ध फिर्याद दिली. त्यानुसार दोघा संशयितांविरूद्ध जामनेर पोलीस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Shocking ... girls pregnant with the exploitation of under-age children