शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! प्रेमविवाहाच्या चौथ्या वर्षी जावयाची निर्घृण हत्या; चिमुकलीच्या डोक्यावरील पितृछत्र हरपले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 16:41 IST

रविवारी सकाळी मुकेश हा दुकानावर जाण्यासाठी घराबाहेर आला. त्यावेळी पूजाच्या माहेरील मंडळींनी कोयता, चॉपरने त्याच्या मानेवर वार केला.

Jalgaon Murder Case : चार वर्षांपूर्वीच्या प्रेमविवाहाचा राग मनात ठेवून मुलीकडील लोकांनी रविवारी सकाळी जळगाव जिल्ह्यातील पिंप्राळा हुडको परिसरात सशस्त्र हल्ला करत जावयाला ठार केले. कोयता आणि चॉपरने वार करण्यात आल्याने मुकेश रमेश शिरसाठ या प्रेमविवाहित २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबातील सात जण जखमी झाले. रामानंदनगर पोलिस ठाण्यात तरुणीचा भाऊ, काका यांच्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मयत मुकेशच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी व मुलगी आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश याने चार वर्षापूर्वी त्याच परिसरातील पूजा नावाच्या तरुणीशी पळून जाऊन विवाह केला होता. तेव्हापासून शिरसाठ कुटुंबीय व तरुणीच्या माहेरील मंडळींमध्ये वाद सुरू आहे. रविवारी सकाळी मुकेश हा दुकानावर जाण्यासाठी घराबाहेर आला. त्यावेळी पूजाच्या माहेरील मंडळींनी कोयता, चॉपरने त्याच्या मानेवर वार केला. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर मयताचा भाऊ, काका, काकू, दोन चुलत भाऊ, चुलत बहीण यांच्यावरही वार केल्याने ते जखमी झाले. मुकेशच्या मृत्यूने त्याच्या चिमुकल्या मुलीच्या डोक्यावरील पितृछत्र हरपले आहे.

९ जणांविरुद्ध गुन्हा 

हत्येप्रकरणी पोलिस ठाण्यात तरुणीचे काका, भाऊ, बाबा, चुलत, आतेभाऊ अशा नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर पिंप्राळा व शासकीय रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण होते.

मुलाच्या मृत्यूनंतर आईला भोवळ 

रुग्णालयात मुकेशच्या मृत्यूची वार्ता समजताच सर्वांना धक्का बसला. त्यावेळी मयताची आई उज्ज्वला यांना भोवळ येऊन त्या बेशुद्ध पडल्या. त्यावेळी त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. मयत, जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केल्यानंतर तेथे त्यांचे कुटुंबीय, मित्रांची मोठी गर्दी झाली होती. मयताचे आई, वडील यांच्यासह घरातील सर्व सदस्यांनी मोठा आक्रोश केला. तसेच हल्ला करणाऱ्या कुटुंबीयांबद्दल संताप व्यक्त केला.

टॅग्स :JalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारीLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट