शॉक लागून वीज कर्मचारी जखमी

By Admin | Updated: June 2, 2014 17:56 IST2014-06-02T17:54:49+5:302014-06-02T17:56:46+5:30

शहरातील आयकर भवनसमोर असलेल्या विद्युत कंपनीच्या कार्यालयात पोलवर काम करताना अचानक स्फोट झाला. शॉक लागून कर्मचारी १५ फुटावरून खाली जमिनीवर कोसळला. यामुळे त्यात तो जखमी झाला.

Shock wounded electric staff injured | शॉक लागून वीज कर्मचारी जखमी

शॉक लागून वीज कर्मचारी जखमी

धुळे : शहरातील आयकर भवनसमोर असलेल्या विद्युत कंपनीच्या कार्यालयात पोलवर काम करताना अचानक स्फोट झाला. शॉक लागून कर्मचारी १५ फुटावरून खाली जमिनीवर कोसळला. यामुळे त्यात तो जखमी झाला. यामुळे तेथे उपस्थित इतर कर्मचार्‍यांची तारांबळ उडाली. पुरेसे साहित्य न दिल्यामुळे वीज कंपनीच्या कारभाराविषयी कमालीची नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मोहन भावरात सैंदाणे (वय २५, रा. भरतनगर, धुळे) हा विद्युत कंपनीचा कर्मचारी रविवारी आयकर भवनसमोर असलेल्या पॉवर सबस्टेशन कार्यालयात विद्युत पोलवर काम करीत होता. या वेळी अचानक रोहित्राचा स्फोट झाला. यामुळे सैंदाणेला जोरदार शॉक लागल्याने तो १५ फूट उंचीवरून जमिनीवर कोसळला. यामुळे इतर कर्मचार्‍यांचा थरकाप उडाला. त्याला सहकार्‍यांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सैंदाणेला शॉक लागल्याने उजव्या हाताला जखम झाली आहे. या वेळी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्यांनी सैंदाणेला हातात ग्लोज, पायात बुट न देता तसेच पोलवर चढविले होते. त्यामुळे हीघटना घडल्याचाआरोप त्याच्या कुटुंबीयातील सदस्यांनी केला आहे. यामुळे त्यांच्या परिवारातील सदस्य व सहकार्‍यांनी रोष व्यक्त केला. सुदैवाने सैंदाणे बचावला. अन्यथा अनर्थ घडला असता, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती.

Web Title: Shock wounded electric staff injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.