शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

ॲड. सदावर्तेच्या पॅनलला जळगाव एसटी पतसंस्थेत धक्का, १७ संचालकांचा कर्मचारी सेनेत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 20:11 IST

चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय कर्मचारी सेनेत प्रवेश केला आहे.

भूषण श्रीखंडे/ जळगाव: गेल्या काही दिवसापांसून एसटी को-ऑपरेटिव्ह बँक संचालक व एसटी कर्मचारी पतपेढीत संस्थेचे ॲड. गुणरत्ने सदावर्ते यांचे पॅनल असलेले एसटी कष्टकरी जनसंघाच्या संचालक मंडळांनी सदावर्ते यांची साथ सोडण्याच्या हालचाली सुरू होत्या. त्यानुसार एसटी कष्टकरी जनसंघाचे जळगाव जिल्हा एसटी कर्मचारी सहकारी पतपेढी लिमिटेड जळगाव या पतसंस्थेचे सर्व संचालक मंडळांनी चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय कर्मचारी सेनेत प्रवेश केला आहे.

राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे प्रमुख मार्गदर्शक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष किरण पावसकर व पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथील बाळासाहेब भवनात जाहीर प्रवेश केला. यावेळी एसटी पतसंस्थेचे चेअरमन अमोल सुरळकर व कष्टकरी जनसंघाचे विभागीय सचिव मनोज सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली बहुतांश संचालकांसह जळगाव विभागातील एरंडोल आगारातील राहुल पाटील राजपूत, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस संघटनेचे आगार अध्यक्षपदाचा व सभासदत्वाचा राजीनामा देत व जळगाव विभागाचे कष्टकरी जनसंघाचे विभागीय कार्याध्यक्ष बी.एल. ब्रह्मे यांनी त्यांचा पदाचा व सभासदत्वाचा राजीनामा देत एरंडोल आगारातील २२५ कर्मचाऱ्यांचा जाहीर प्रवेश केलेला आहे. यात प्रभाकर मोरे, कैलास साबळे, सुकलाल सूर्यवंशी, दीपक कोळी आदी पदाधिकारी यांनी देखील जाहीर प्रवेश केलेला आहे.

ॲड. सदावर्ते यांच्या पॅनलला धक्का

वर्षभरापूर्वी ॲड. गुणरत्ने सदावर्ते यांच्या पॅनलने एसटी कर्मचारी बँक तसेच एसटी कर्मचारी पतपेढीत निवडणुकीत बहुमताने सत्ता मिळवली होती. परंतु वर्षभरात संचालक मंडळात नाराजी व धुसफूस सुरू झाली. त्यात जळगाव जिल्हा एसटी कर्मचारी पतसंस्थेचे १७ संचालकांनी राष्ट्रीय कर्मचारी सेनेत प्रवेश केला आहे.

टॅग्स :Gunratna Sadavarteगुणरत्न सदावर्तेJalgaonजळगाव