भुसावळात बंद एटीएमला हार घालून शिवसेनेकडून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 22:45 IST2018-04-22T22:45:22+5:302018-04-22T22:45:22+5:30
शिवसेना पदाधिकाºयांनी शहरातील प्रत्येक बँकेच्या बंद ‘एटीएम’ला २२ रोजी पुष्पहार घालून गांधीगिरी केली. यावेळी सरकारचा चलन तुटवड्याबद्दल निषेध केला.

भुसावळात बंद एटीएमला हार घालून शिवसेनेकडून निषेध
आॅनलाईन लोकमत
भुसावळ, दि.२२ : सरकारचा नोटबंदीचा निर्णय फसला असा खरा अभिप्राय बँक अधिकाऱ्यांनी जाहीर करवा म्हणून शिवसेना पदाधिकाºयांनी शहरातील प्रत्येक बँकेच्या बंद ‘एटीएम’ला २२ रोजी पुष्पहार घालून गांधीगिरी केली. यावेळी सरकारचा चलन तुटवड्याबद्दल निषेध केला.
२२ रोजी सकाळी ११ वाजता शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार उपजिल्हा संघटक विलास मुळे, तालुका प्रमुख समाधान महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळात प्रा.धीरज पाटील यांच्या नेतृत्वात शिक्षकसेना जिल्हा प्रमुख प्राचार्य विनोद गायकवाड, शिवसेना उपतालुका प्रमुख हिरामण पाटील, मनोहर बारसे, उपशहर प्रमुख राकेश खरारे, नीलेश महाजन, संतोष सोनवणे, सोनी ठाकूर, योगेश बागूल, अमोल पाटील, शरद जोहरे, दत्तू नेमाडे, सुनील बोंडे, बबलू बºहाटे, वरणगावात नीलेश ठाकूर, अबरार खान, गोकुळ बाविस्कर, सुरेंद्र सोनवणे, तुषार बºहाटे, विक्की चव्हाण यांच्यातर्फे प्रत्येक बंद एटीएमला पुप्षहार घालून शिवसेनेतर्फे गांधीगिरी करण्यात आली व सरकारचा निषेध करण्यात आला.