शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

खड्डे दुरुस्तीसाठी बेशर्मीचे झाड लावून शिवसेनेचे गांधीगिरी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 16:28 IST

खड्डे दुरुस्तीसाठी बेशर्मीचे झाड लावून शिवसेनेने गांधीगिरी करीत आंदोलन केले. या आंदोलनास काँग्रेसनेही समर्थन दिले.

ठळक मुद्देकाँग्रेसनेही दिले समर्थनविविध स्तरावरील कार्यकर्त्यांची हजेरी

मुक्ताईनगर, जि.जळगाव : खड्डे दुरुस्तीसाठी बेशर्मीचे झाड लावून शिवसेनेने गांधीगिरी करीत आंदोलन केले. या आंदोलनास काँग्रेसनेही समर्थन दिले.येथील प्रवर्तन चौकात ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे पाईपलाईन लिकेज दुरुस्त करताना खोदलेला खड्डा तात्पुरत्या स्वरूपात जेसीबीने जेमतेम माती ढकलण्यात आली होती. ही माती काही अवजड वाहनांमुळे दबली गेली. अनेक अवजड व प्रवासी वाहने यात फसण्याचे प्रकार घडलेले आहेत, तर काही वाहने उलटण्याच्या परिस्थितीत होते. या ठिकाणी अपघात होऊन जीवित हानी होऊ शकते. सार्वजनिक बांधकाम विभाग व पाणीपुरवठा विभाग तसेच नगरपंचायत प्रशासन यांना निवेदन व सूचना देऊनही दीड महिना उलटल्यावरही संबंधित विभागातर्फे टोलवाटोलवी व हलगर्जीपणा करीत आहे. मात्र हा खड्डा एखाद्या जीवघेणा अपघाताला आमंत्रण देऊ शकतो यासाठी शिवसेनेने आक्रमक होत येथे बेशर्मीचे झाड लावून गांधीगिरी आंदोलन केले व येत्या आठ दिवसात जर हा खड्डा पूर्ववत न झाल्यास आणखी प्रचंड आंदोलन करण्याची इशारा देण्यात आला आहे. तसेच आंदोलनस्थळी पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता यांना पुष्पहार घालून बेशर्मीचे झाडही भेट देण्यात आले.याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, तालुकाप्रमुख छोटू भोई, अ‍ॅड.मनोहर खैरनार, गोपाळ सोनवणे, अल्पसंख्याक जिल्हा संघटक अफसर खान, उपतालुका प्रमुख बाळा भालशंकर, राजेंद्र तळेले, शहरप्रमुख गणेश टोंगे, राजेंद्र हिवराळे, माजी सरपंच रामभाऊ पुनासे, जाफर अली, सलीम खान, जहीर शेख, शकुर जमदार, तालुका संघटक प्रवीण चौधरी, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, शहर संघटक वसंत भलभले, नगरसेवक संतोष मराठे, युवासेना उपजिल्हाप्रमुख पवन सोनवणे, युवासेना तालुकाप्रमुख पंकज राणे, संतोष माळी, दीपक खुळे, आकाश सापधरे, चेतन पाटील, किरण कोळी, स्वप्नील श्रीखंडे, अमोल भोई, शुभम तळेले, योगेश पाटील, राजू पाटील वढवा आदी शिवसैनिक उपस्थित होते.आंदोलन सुरू असताना कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ.जगदीश पाटील गाडीतून उतरून आंदोलनात सहभागी झाले होते. तज्ज्ञांमार्फत हा खड्डा न बुजता मजुरांकडून लिकेज जोडण्याचे काम केले जाते. त्यामुळे गेल्या २० वर्षांपासून या ठिकाणी ही समस्या दर महिन्याला निर्माण होतम, असे सांगत डॉ.जगदीश पाटील यांनी शिवसेनेने नागरी समस्येकरिता केलेल्या आंदोलनाला कॉंग्रेसचा पाठिंबा असल्याचे सांगितले. 

टॅग्स :agitationआंदोलनMuktainagarमुक्ताईनगर