जळगाव - मनपा निवडणुकीत भाजपाकडून विकासाच्या वल्गना केल्या जात आहेत. चार वर्षात बोंब पाडली नाही, आता मात्र थापा मारल्या जात आहे. भाजपावाले मात्र हे विसरत आहेत की, गेल्या निवडणुकीत सुरेशदादा जळगावात नसताना भाजपाला सत्ता मिळवता आली नाही. आता तर शिवसेनेचा वाघ प्रचारात उतरला आहे. जळगावचे नागरिक भाजपाला चारीमुंड्या चीत करून मनपावर शिवसेनेचा भगवा फडकवतील असा विश्वास सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.सोमवारी मनपा निवडणुकीसाठी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेकडून प्रचंड रॅली काढण्यात आली. या रॅलीचा समारोप कोर्ट चौक परिसरात झाला. यावेळी झालेल्या सभेत ते बोलत होते. माजी मंत्री सुरेशदादा जैन, आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, किशोर पाटील, माजी आमदार आर.ओ.तात्या पाटील, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्यासह शिवसेनेचे सर्व उमेदवार उपस्थित होते. यावेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी चौफेर फटकेबाजी करत भाजपाचे आमदार सुरेश भोळे व खासदार ए.टी.पाटील यांच्यावर जोरदार टिकास्त्र सोडले.
जळगावकर भाजपाला चारीमुंड्या चीत करून मनपावर भगवा फडकवणार : गुलाबराव पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 19:46 IST
गेल्या निवडणुकीत सुरेशदादा जळगावात नसताना भाजपाला सत्ता मिळवता आली नाही. आता तर शिवसेनेचा वाघ प्रचारात उतरला आहे. जळगावचे नागरिक भाजपाला चारीमुंड्या चीत करून मनपावर शिवसेनेचा भगवा फडकवतील असा विश्वास सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.
जळगावकर भाजपाला चारीमुंड्या चीत करून मनपावर भगवा फडकवणार : गुलाबराव पाटील
ठळक मुद्देआमदार सुरेश भोळे यांनी रस्ता दाखविल्यास एक लाख रुपये देणारशिवसेनेची शेवटच्या दिवशी प्रचंड रॅलीखासदार ए.टी.पाटील व आमदार सुरेश भोळे यांच्यावर सोडले टिकास्त्र