Shivsena: शिंदेगटाच्या आमदार भावाला बहिणीने दाखवला इंगा, शिवसेना कार्यालयच घेतलं ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 08:25 AM2022-08-08T08:25:27+5:302022-08-08T08:28:08+5:30

आमदार किशोर पाटील हे शिंदे गटाचे आमदार असून त्यांच्या बहिण वैशाली सूर्यवंशी यांनी उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. 

Shivsena: Shinde group MLA brother kishor patil showed Inga by his sister vaishali suryavanshi, the office was taken into custody in pachora constituency | Shivsena: शिंदेगटाच्या आमदार भावाला बहिणीने दाखवला इंगा, शिवसेना कार्यालयच घेतलं ताब्यात

Shivsena: शिंदेगटाच्या आमदार भावाला बहिणीने दाखवला इंगा, शिवसेना कार्यालयच घेतलं ताब्यात

googlenewsNext

जळगाव - युवासेना प्रमुख आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेला 9 ऑगस्ट रोजी जळगाव जिल्ह्यातून सुरुवात होत आहे. येथील पाचोऱ्यातून ते आपल्या शिवसंवाद यात्रेचा प्रारंभ करत आहेत. त्या अनुषंगाने पाचोरा शहरातील शिवसेना कार्यालय येथे तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. तत्पूर्वी येथील शिवसेना संपर्क कार्यालयावर असलेला आमदार किशोर पाटील यांच्या नावाचा फलक काढण्यात आला आहे. कारण, आमदार किशोर पाटील हे शिंदे गटाचे आमदार असून त्यांच्या बहिण वैशाली सूर्यवंशी यांनी उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. 

माजी आमदार आर.ओ. पाटील यांच्या कन्या व पाचोरा निर्मल सिड्सच्या संचालिका वैशालीताई सूर्यवंशी यांनी सांगितले की, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावरची निष्ठा आणि माझे वडील स्व. तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांनी दाखवलेल्या मार्गावर मी चालत आहे. त्यावेळी, अनेक संकटे माझ्यासमोर आली आणि पुढेही येणार आहेत. तरी, या सर्व गोष्टींचा विचार करून मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे, एकनिष्ठ होऊन काम करेन, असा शब्द त्यांना दिला. पक्षाकडून माझ्यावर जी जबाबदारी दिली जाईल, ती मी स्वीकारेल, असेही वैशाली यांनी बैठकीत कार्यकर्त्यांशी बोलताना स्पष्ट केले.  

वैशाली यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत राहण्याचा निर्णय कार्यकर्त्यांसमोर जाहीर केला असून 9 ऑगस्ट रोजी आदित्य ठाकरेंच्या स्वागताची जल्लोषात तयारी सुरु केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर येथील शिवसेना संपर्क कार्यालय वैशाली यांनी आपल्या ताब्यात घेतलं आहे. कारण, हे कार्यालय ज्याठिकाणी आहे, ती वैशाली यांची खासगी मालमत्ता आहे. विशेष म्हणजे या कार्यालयावरील आमदार किशोर पाटील यांचा बॅनरही प्राधान्याने काढण्यात आला. त्यामुळे, बहिण भावाच्या राजकीय विरोधाची सध्या जिल्ह्यात चर्चा रंगली आहे. आमदार किशोर पाटील विरुद्ध त्यांची बहिणी वैशाली सूर्यवंशी असाच सामना आता पाचोरा विधानसभेत रंगल्याचं दिसून येत आहे. 
 

Web Title: Shivsena: Shinde group MLA brother kishor patil showed Inga by his sister vaishali suryavanshi, the office was taken into custody in pachora constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.