धरणगावात बोंडअळी अनुदानासाठी शिवसैनिकांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 21:52 IST2018-11-28T21:49:41+5:302018-11-28T21:52:47+5:30
सन २०१७/२०१८ या कालावधीत शासनाने बोडअळीचे अनुदान लाभार्थींच्या खात्यावर चेक व्दारे जमा केले होते. मात्र अद्याप हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्याने बुधवार २८ रोजी स्टेट बँकेवर शिवसैनिकांनी मोर्चा नेत व्यवस्थापकाला जाब विचारला.

धरणगावात बोंडअळी अनुदानासाठी शिवसैनिकांचा मोर्चा
धरणगाव : सन २०१७/२०१८ या कालावधीत शासनाने बोडअळीचे अनुदान लाभार्थींच्या खात्यावर चेक व्दारे जमा केले होते. मात्र अद्याप हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्याने बुधवार २८ रोजी स्टेट बँकेवर शिवसैनिकांनी मोर्चा नेत व्यवस्थापकाला जाब विचारला. यावेळी लवकरच अनुदान जमा करण्याचे आश्वासन व्यवस्थापक राजपूत यांनी दिले.
शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्त्वाखाली हा मोर्चा नेण्यात आला. यावेळी निवेदन देण्यात आले. त्यात अनुदान तत्काळ जमा करावे तसेच संजय निराधार योजनेचे पैसे लवकरात लवकर जमा करावे. मागण्या मान्य न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, उपनगराध्यक्ष वासुदेव चौधरी, गटनेते विनय भावे, नगरसेवक सुरेश महाजन, विलास महाजन, नंदकिशोर पाटील, उपतालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे, शहर प्रमुख राजेंद्र महाजन, किरण अग्निहोत्री, शहर संघटक धिरेंद्र पुरभे, माजी सभापती प्रमोद पाटील, बालू जाधव, किरण मराठे, विलास पवार, विनोद रोकडे, जयेश महाजन यांच्यासह धरणगाव परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते.