ममुराबादला शिवजयंती उत्साहात साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:45 IST2021-02-20T04:45:27+5:302021-02-20T04:45:27+5:30

ममुराबाद : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कोरोनाची स्थिती ...

Shiva Jayanti celebrations in Mamurabad | ममुराबादला शिवजयंती उत्साहात साजरी

ममुराबादला शिवजयंती उत्साहात साजरी

ममुराबाद : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कोरोनाची स्थिती लक्षात घेता यंदा भव्य दिव्य मिरवणुका टाळण्यात आल्या.

ग्रामपंचायत कार्यालयात नवनिर्वाचित सरपंच हेमंत चौधरी व उपसरपंच आशमाबी शेख नाशीर यांनी शिव प्रतिमेचे पूजन केले. यावेळी ग्रा.पं. सदस्या साधना चौधरी, सुनीता चौधरी, रंजना ढाके, प्रीतम पाटील, आरती पाटील, लताबाई तिवारी, अंजनाबाई शिंदे, कल्पना शिंदे, शैलेश पाटील, अमर पाटील, संतोष कोळी, विलास सोनवणे, अनिस पटेल, एजाज पटेल, गोपाळकृष्ण मोरे, ग्रामसेवक आर. आर. मनोरे, लिपिक ज्ञानेश्वर सावळे, राजरत्न साळुंके आदी उपस्थित होते. याशिवाय गावातील पीक संरक्षण सहकारी संस्थेत ज्येष्ठ सदस्य अशोक गावंडे यांच्या हस्ते शिव प्रतिमेचे पूजन झाले. संस्थेचे पदाधिकारी बन्सी पाटील, अनिल पाटील, रावजी शिंदे आदी उपस्थित होते.

----------------

फोटो-

ममुराबादला ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीप्रसंगी उपस्थित सरपंच हेमंत चौधरी, उपसरपंच आशमाबी शेख आदी.

Web Title: Shiva Jayanti celebrations in Mamurabad