शिव कॉलनीत शिक्षकाकडे घरफोडी
By Admin | Updated: September 26, 2015 00:51 IST2015-09-26T00:51:35+5:302015-09-26T00:51:35+5:30
जळगाव : शिवकॉलनीत सेवानिवृत्त झालेल्या नरेंद्र कुळकर्णी यांच्याकडे शुक्रवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास घरफोडी झाली आहे.

शिव कॉलनीत शिक्षकाकडे घरफोडी
जळगाव : शिवकॉलनीत सेवानिवृत्त झालेल्या नरेंद्र भालचंद्र कुळकर्णी (वय 72) या वृध्द दाम्पत्याकडे शुक्रवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास घरफोडी झाली आहे. या घटनेत तीस हजार रुपये रोख व 17 हजार रुपये किमतीचा एलसीडी लांबविण्यात आला आहे. चोरटय़ाने डोक्याला मागे बुचडा बांधलेला होता असे कुळकर्णी यांनी सांगितले. दरम्यान, याबाबत रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोखंडी सळईने तोडले ग्रील कुळकर्णी दाम्पत्य हे गाढ झोपलेले असताना चोरटय़ाने खिडीकीच्या खाली अंगणातील त्यांच्या दुचाकीवर चढून लोखंडी सळईने एका बाजुची ग्रील बाजुला करून घरात प्रवेश मिळविला. त्याने पॅँटच्या खिशातील 500 रुपयांच्या साठ नोटा (तीस हजार रुपये) काढल्यानंतर एलसीडी काढून खिडकीच्या बाहेर काढला. तितक्यात कुळकर्णी यांना जाग आली. त्याला रोखण्याच्या प्रय}ात त्याने पळ काढला. सहा जणांना घेतले ताब्यात पोलीस निरीक्षक प्रवीण वाडीले, उपनिरीक्षक दिलीप पाटील, गुन्हे शोध पथकाचे प्रदीप चौधरी यांनी घटनास्थळावर जाऊन माहिती घेतली. त्यानंतर राजीव गांधी नगरातून सहा जणांना ताब्यात घेतले. परंतु त्यांचा यात सहभाग नसल्याचे सिध्द झाल्याने सोडून देण्यात आले.काही दिवसांच्या विश्रांतीनंतर चोरटे पुन्हा एकदा सक्रीय झाले असल्याचे या घटनेवरुन सिद्ध होत आहे. पोलीस गणेशोत्सवाच्या बंदोबस्तात असल्याने चोरटय़ांनी संधी साधली.