शेतकऱ्यांना थकीत रक्कम मिळण्यासाठी शिवसेनेचे ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 21:23 IST2019-11-05T21:23:45+5:302019-11-05T21:23:55+5:30
चोसाका प्रकरण : तहसीलदारांच्या आदेशानंतर आंदोलन मागे

शेतकऱ्यांना थकीत रक्कम मिळण्यासाठी शिवसेनेचे ठिय्या आंदोलन
चोपडा : चहार्डी येथील साखर कारखान्यास परिसरातील सभासद ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी २०१४-१५ या गळीत हंगामासाठी ऊस पुरविला होता. त्यावेळेचे प्रतिटन ६०० रुपये प्रमाणे रक्कम साखर कारखान्याकडे थकीत आहे. त्या पैशांच्या मागणीसाठी शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी तहसील कार्यालयासमोर मंगळवारी ठिय्या आंदोलन केले.
१३ कोटी १३ लाख ८७ हजार रुपये बुलढाणा अर्बन बँकेकडून वसुली करण्याबाबत जिल्हाधिकारी यांचा ३ आॅगस्ट रोजीचा आदेश आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये सदर रक्कम शेतकºयांना तत्काळ वसूल करून द्यावी, असा आदेश होता. परंतु याकडे संचालक मंडळाने दुर्लक्ष केले. शेतकºयांना तत्काळ पेमेंट मिळावे म्हणून शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी तहसील कार्यालयासमोर ५ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेअकरा वाजेच्यासुमारास ठिय्या आंदोलन केले.
यावर पर्याय म्हणून बुलढाणा अर्बन पतसंस्थची सर्व खाती सील करून सदर रक्कम चोपडा साखर कारखान्याच्या बँक खात्यामध्ये वर्ग होत नाही तोपर्यंत खाती सील केली जातील असे तहसीलदार अनिल गावित यांनी सांगितले. आंदोलनात ज्येष्ठ कार्यकर्ते दीपक जोहरी, तालुकाप्रमुख राजेंद्र बिटवा (पाटील), शहराध्यक्ष आबा देशमुख, विधानसभा क्षेत्रप्रमुख तथा माजी उपनगराध्यक्ष विकास पाटील, जिल्हा परिषद सदस्य हरीश पाटील, पंचायत समितीचे उपसभापती एम.व्ही. पाटील, पंचायत समिती सदस्य भरत बाविस्कर, दीपक चौधरी, चौगावचे माजी सरपंच सुकलाल कोळी, अॅड.शिवराज पाटील, शरद पाटील, अॅड.एस.डी.सोनवणे आदी उपस्थित होते.