अमळनेरात शिवसेनेच्या संपर्क अभियानास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:13 IST2021-07-16T04:13:30+5:302021-07-16T04:13:30+5:30

अमळनेर : शिवसेनेच्या संपर्क अभियानाचा शुभारंभ जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सभासद नोंदणीही करण्यात आली. ...

Shiv Sena's liaison campaign started in Amalner | अमळनेरात शिवसेनेच्या संपर्क अभियानास सुरुवात

अमळनेरात शिवसेनेच्या संपर्क अभियानास सुरुवात

अमळनेर : शिवसेनेच्या संपर्क अभियानाचा शुभारंभ जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सभासद नोंदणीही करण्यात आली.

उद्धव ठाकरे यांचे धोरणात्मक आणि विकासात्मक निर्णय सामान्य जनतेपर्यंत पोहोचवा, असे आवाहन विष्णू भंगाळे यांनी केले. यावेळी महिला जिल्हाप्रमुख महानंदा पाटील, मनीषा परब, तालुकाप्रमुख विजय पाटील यांनी मार्गदर्शन केले. शिरूड नाका परिसर, पैलाड, ताडेपुरा भागात सभासद नोंदणी करण्यात आली. याप्रसंगी शहरप्रमुख संजय पाटील, नगरसेविका रत्नमाला महाजन, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष सुरेश पाटील, नगरसेवक प्रताप शिंपी, चंद्रशेखर भावसार, श्रीकांत पाटील, अमर पाटील, संगीता शिंदे, देवेंद्र देशमुख, मोहन भोई, विनोद राऊळ, जयश्री बैसाणे, ज्ञानेश्वर पाटील, राजू पाटील, विठ्ठल पाटील, बाबू परब हजर होते.

Web Title: Shiv Sena's liaison campaign started in Amalner