चाळीसगावात शिवसेनेचा वर्धापन दिन पेढे वाटून साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:13 IST2021-06-20T04:13:32+5:302021-06-20T04:13:32+5:30

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज तसेच दिवंगत शिवसेनाप्रमुख सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिवसैनिकांनी एकमेकांना पेढे वाटून साजरा ...

Shiv Sena's anniversary celebrated in Chalisgaon | चाळीसगावात शिवसेनेचा वर्धापन दिन पेढे वाटून साजरा

चाळीसगावात शिवसेनेचा वर्धापन दिन पेढे वाटून साजरा

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज तसेच दिवंगत शिवसेनाप्रमुख सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिवसैनिकांनी एकमेकांना पेढे वाटून साजरा केला. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर शिवसेनेच्या स्थापनेत मुंबईमध्ये हजर असलेले वयोवृद्ध शिवसेना नेते तुकाराम कोळी यांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. तुकाराम कोळी यांनी शिवसेनेच्या स्थापनेनंतर सहा महिन्यांत चाळीसगावात शिवसेना स्थापन करून संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात शिवसेना विस्तार करण्यात मोठा वाटा उचलला होता.

महेंद्र पाटील व दिलीप घोरपडे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख रमेश चव्हाण, जिल्हा समन्वयक महेंद्र पाटील, तालुका प्रवक्ते दिलीप घोरपडे, तालुका संघटक सुनील गायकवाड, महिला आघाडी तालुका प्रमुख सविता कुमावत, उपशहर प्रमुख शैलेंद्र सातपुते, शाखा प्रमुख रामेश्वर चौधरी, बाबूलाल निंबा पवार, ज्येष्ठ शिवसैनिक अण्णा पाटील, साहेबराव आगोणे, लक्ष्मण बोराडे, प्रभाकर भोगले, पांडुरंग बोराडे, धर्मा राठोड, संतोष गायकवाड, नंदू गायकवाड, गणेश भवर, दिनेश विसपुते, प्रदीप पिंगळे, भावडू साळुंके, सुभाष राठोड, नाना चौधरी, छोटू दादा, आप्पा देवरे, अनिल पिंगळे, वसीम चेअरमन, चेतन कुमावत आदी उपस्थित होते.

Web Title: Shiv Sena's anniversary celebrated in Chalisgaon