एकनाथ खडसे यांच्या कोथळीत शिवसेनेला पाच जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 16:44 IST2021-01-18T16:44:04+5:302021-01-18T16:44:13+5:30
राष्ट्रवादी व भाजपकडूनही विजयाचा दावा

एकनाथ खडसे यांच्या कोथळीत शिवसेनेला पाच जागा
मुक्ताईनगर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कोथळी या गावात ११
पैकी पाच जागा जिंकत शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला
सहा जागा मिळाल्या आहेत.
कोथळी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले नेते एकनाथ खडसे यांचे मूळ गाव.
खासदार रक्षा खडसे देखील याच गावात राहतात. कोथळीत अनेक वर्षांपासून
भाजपाचे वर्चस्व कायम होते. मागील पंचवार्षिकमध्ये सरपंचपद शिवसेनेकडे होते.
उर्वरित जागांवर भाजपचे अर्थातच खडसे यांचे उमेदवार निवडून आले होते. या
निवडणुकीत शिवसेनेने सहा जागांवर उमेदवार दिले होते. त्यापैकी पाच जागा निवडून
आल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेची जोरदार मुसंडी मानली जात आहे.
दरम्यान खासदार रक्षा खडसे यांनी निवडून आलेले उमेदवार हे खडसे परिवारावर प्रेम
करणारे असल्याचे सांगितले तर राष्ट्रवादीच्या नेत्या व जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षा ॲड.
रोहिणी खडसे -खेवलकर यांनी विजयी उमेदवार हे खडसे यांच्यावर प्रेम करणारे
असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे नेमकी ग्रामपंचायत कुणाची? याबाबत संभ्रम कायम
आहे.