विधानसभेत गोंधळ घालणाऱ्या भाजप आमदारांच्या फोटोंवर शिवसैनिकांनी टाकली शाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:12 IST2021-07-08T04:12:25+5:302021-07-08T04:12:25+5:30

त्या आमदारांनी केलेल्या गोंधळाचा सेनेकडून निषेध : पेट्रोल-दरवाढीविरोधात घोषणाबाजी लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान तालिका अध्यक्षांना शिवीगाळ ...

Shiv Sainiks put ink on photos of BJP MLAs causing chaos in the assembly | विधानसभेत गोंधळ घालणाऱ्या भाजप आमदारांच्या फोटोंवर शिवसैनिकांनी टाकली शाई

विधानसभेत गोंधळ घालणाऱ्या भाजप आमदारांच्या फोटोंवर शिवसैनिकांनी टाकली शाई

त्या आमदारांनी केलेल्या गोंधळाचा सेनेकडून निषेध : पेट्रोल-दरवाढीविरोधात घोषणाबाजी

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान तालिका अध्यक्षांना शिवीगाळ करून, गोंधळ घालणाऱ्या भाजप आमदारांच्या प्रतिमांवर बुधवारी शिवसेनेकडून शाई टाकून आमदारांनी केलेल्या कृत्यांचा तीव्र घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला.

महापालिकेसमोर बुधवारी दुपारी १ वाजता शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, विजय बांदल, चिंतामण जैतकर, मंगला बारी, मनीषा पाटील यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी शिवसैनिकांनी गोंधळ घालणाऱ्या आमदारांविरोधात घोषणाबाजी केली. तसेच ‘लोकशाहीला काळिमा फासणाऱ्या भाजपचा निषेध असो’ अशा घोषणा देत, सर्व निलंबित आमदारांच्या प्रतिमांवर शाई टाकून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधातदेखील शिवसैनिकांनी केंद्र शासनाविरोधात घोषणा देत, याबद्दलही निषेध व्यक्त करण्यात आला. भाजपच्या आमदारांनी विधानसभेत ज्या प्रकारे तालिका अध्यक्षांना शिवीगाळ करून गोंधळ घातला हा एकप्रकारे लोकशाहीचा गळा दाबण्याचे काम असून, या आमदारांना कायमचे निलंबित करण्याची मागणी यावेळी शिवसैनिकांनी केली.

Web Title: Shiv Sainiks put ink on photos of BJP MLAs causing chaos in the assembly