संकल्प सप्ताहात शिवसैनिकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:12 IST2021-06-21T04:12:54+5:302021-06-21T04:12:54+5:30
प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या आंदोलनासह कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी सांगितले. त्याचाच एक भाग म्हणून येथील विश्रामगृहात ...

संकल्प सप्ताहात शिवसैनिकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या आंदोलनासह कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी सांगितले. त्याचाच एक भाग म्हणून येथील विश्रामगृहात सचिन सोमवंशी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी जारगाव येथील शिवसेनेचे शरीफ शेख, शंकर सोनवणे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी शहराध्यक्ष अमजद पठाण, माजी सभापती शेख शेख फकिरा, राजेंद्र महाजन, जिल्हा उपाध्यक्ष विकास वाघ, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, कृ. बा. प्रशासक प्रा. एस. डी. पाटील, महिला तालुकाध्यक्षा कुसुम पाटील, जिल्हा महिला पदाधिकारी ॲड. मनीषा पवार, संगीता नेवे, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष शरीफ खाटीक, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड. अंबादास गिरी, प्रकाश चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
बैठकीला जिल्हा अल्पसंख्याक उपाध्यक्ष इरफान मनियार, आरोग्य सेवा सेल तालुकाध्यक्ष डॉ. फिरोज शेख, इस्माईल तांबोळी, युवक विधानसभा अध्यक्ष संदीप पाटील, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, कल्पेश येवले, शीला सूर्यवंशी, दीपक पाटील, समाधान पाटील, गणेश पाटील, संजय सोनार, ज्ञानेश्वर पाटील आदी उपस्थित होते.