शिव छावा संघटनेवर किशोर गोरे नियुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:15 IST2021-07-25T04:15:43+5:302021-07-25T04:15:43+5:30
पारोळा : येथील किशोर वामनराव गोरे यांची शिव ...

शिव छावा संघटनेवर किशोर गोरे नियुक्त
पारोळा : येथील किशोर वामनराव गोरे यांची शिव छावा संघटनेच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र राज्य शिव छावा संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा संगीता मुरकुटे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत किशोर गोरे यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी केंद्रीय अध्यक्ष किरण पिंगळे पाटील तसेच महासचिव लव शिवाजी डमरे पाटील, महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख शरद पवार, आडू मान्यवर उपस्थित होते.
बैठकीस जिल्हाध्यक्ष सागर शिवाजी भोसले, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र लक्ष्मण चौधरी, तालुकाध्यक्ष गणेश पाटील, कपिल चौधरी, शहराध्यक्ष ईश्वर पाटील, युवक शहर अध्यक्ष उमेश चौधरी व सर्व शिव छावा पदाधिकारी उपस्थित होते.