अपहरण झालेल्या युवकाची शिताफीने सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:18 IST2021-09-03T04:18:59+5:302021-09-03T04:18:59+5:30

१ सप्टेंबर रोजी दुपारी २.१५ च्या सुमारास पाचोरा येथील बहिरम नगर भागात रहाणाऱ्या ऊसतोड कामगाराचा मुलगा कुणाल दिनेश ...

Shitafi rescues abducted youth | अपहरण झालेल्या युवकाची शिताफीने सुटका

अपहरण झालेल्या युवकाची शिताफीने सुटका

१ सप्टेंबर रोजी दुपारी २.१५ च्या सुमारास पाचोरा येथील बहिरम नगर भागात रहाणाऱ्या ऊसतोड कामगाराचा मुलगा कुणाल दिनेश तडवी (१८) याचे पाचोरा-जळगाव महामार्गावर गोराडखेडे गावाजवळून अज्ञातांनी बळजबरीने कारमध्ये (एमएच४२/एएच५९९९)कोंबून अपहरण केले. याप्रकरणी रात्री उशिरा पाचोरा पोलिसात कुणालचा मित्र दीपक अनिल पवार याने फिर्याद दिली व कुणालला गाडीत बसवून पळवून नेल्याचे नमूद केले.

पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांनी तत्काळ तपास चक्रे फिरविली. कुणालजवळील मोबाइलचे स्थान पडताळणी करून औरंगाबाद वाळूज पोलिसांना संदेश पाठविला. त्याचवेळी अपहरणकर्त्यांनी गाडी एका ढाब्यावर रात्री ११ वाजता थांबवली असता कुणाल याने शिताफीने स्वतःची सुटका करीत ढाब्यावरून पळ काढला. तो शेताच्या दिशेने पळाल्याने अपहरणकर्त्यांच्या हातावर तुरी देत निसटला व थेट वाळूज पोलीस स्टेशनला दाखल झाला.

पाचोरा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस उपनिरीक्षक विनोद शिंदे, पो. काँ. सचिन निकम, सुनील पाटील यांनी त्यास २४ तासाच्या आत पाचोरा येथे घरी पोहोच केले.

दरम्यान, कुणालची आई ऊस तोडणीसाठी नगर जिल्ह्यात कारखान्यावर गेली आहे. अपहरणकर्त्यांनी कुणालजवळ ऊस तोडणी संदर्भातील पैशांसाठी अपहरण केल्याचे सांगितले. यावरून ऊसतोड मजुरीच्या हिशेबासाठी अपहरण केल्याचे पोलिसांनी सांगितले. अपहरणकर्त्यांचा शोध सुरू असून, लवकरच त्यांना पकडून आणू, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Shitafi rescues abducted youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.