शिरसोदे ग्रामपंचायत सदस्य अपात्रतेस न्यायालयाची स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 22:38 IST2019-08-17T22:38:21+5:302019-08-17T22:38:40+5:30
पारोळा : तालुक्यातील शिरसोदे येथील ग्रामपंचायत सदस्य गायत्री दत्तात्रय पाटील यांना अपात्र करण्याच्या जिल्हाधिकारी व अपर आयुक्त, नाशिक यांच्या ...

शिरसोदे ग्रामपंचायत सदस्य अपात्रतेस न्यायालयाची स्थगिती
पारोळा : तालुक्यातील शिरसोदे येथील ग्रामपंचायत सदस्य गायत्री दत्तात्रय पाटील यांना अपात्र करण्याच्या जिल्हाधिकारी व अपर आयुक्त, नाशिक यांच्या आदेशास उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एम.एस.कर्र्णिक यांनी सदरील आपत्रतेच्या दोन्ही आदेशास स्थगिती दिली. तसेच गायत्री पाटील यांना शिरसोदे येथील ग्रामपंचायत सदस्य पदाचा पदभार सुपूर्द करण्याचे आदेश पारित केले.