शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
3
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
4
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
5
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
6
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
7
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
8
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
9
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
10
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
11
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
12
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
13
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
14
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
15
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
16
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
17
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
18
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
19
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
20
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास

शिंदेंची बदली अन् कर्मचा-यांचा सुटकेचा नि:श्वास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 16:22 IST

पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची गेल्या आठवड्यात बदली झाली. तशी शिंदे यांच्या बदलीची अनेक दिवसापासून चर्चा सुरु होतीच,किंबहूना त्यासाठी काही विशिष्ट गटही प्रयत्नशील होता. शिंदे यांच्या बदलीची ज्या दिवशी आर्डर आली, त्या दिवशी अधिकारी व कर्मचाºयांनी (सर्वच नाही) सुटकेचा नि:श्वास सोडला.

ठळक मुद्देविश्लेषण विशिष्ट गटाची मक्तेदारी सुरु आणखी घडामोडीचे संकेत

सुनील पाटीलजळगाव : पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची गेल्या आठवड्यात बदली झाली. तशी शिंदे यांच्या बदलीची अनेक दिवसापासून चर्चा सुरु होतीच,किंबहूना त्यासाठी काही विशिष्ट गटही प्रयत्नशील होता. शिंदे यांच्या बदलीची ज्या दिवशी आॅर्डर आली, त्या दिवशी अधिकारी व कर्मचा-यांनी (सर्वच नाही) सुटकेचा नि:श्वास सोडला. पोलीस अधीक्षक कार्यालयात असलेल्या एका विभागात तर पेढेही वाटल्याची चर्चा आहे. दुसरीकडे बहुतांश कर्मचा-यांच्या मते शिंदे यांची अजून बदली व्हायला नको होती.शिंदे यांच्या बदलीनंतर प्रामुख्याने काही बाबी प्रकर्षाने जाणवू लागल्या. पोलीस अधीक्षक कार्यालयात येताना हेल्मेट सक्ती बंद झाली. अवैध धंदे चालक व त्यांच्याशी संबंधित अधिकारी, कर्मचा-यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. ग्रामीण भागात अवैध धंदे पुन्हा सुरु झाले.स्थानिक गुन्हे शाखेची बंद झालेली बीट संकल्पना पुन्हा सुरु झाली. काही विशिष्ट लोकांची मक्तेदारी पुन्हा सुरु झाली. या सा-या बाबी आता उघडपणे कोणी दिसायला लागल्या आहेत. शेवटी राजाची भूमिका कशी, त्यावरच प्रजाचे कामकाज चालते. माझ्या बदलीने अवैध धंदे चालकांमध्ये आनंदाचे वातावरण असेल, असे खुद्द शिंदे यांनी निरोप समारंभाच्या कार्यक्रमात बोलून दाखविले. त्यांच्या बोलण्यात शंभर टक्के तथ्यही आहे. नूतन पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले अजून बैठकांमध्येच व्यस्त आहेत. लोकसभा निवडणूक महत्वाची असल्याने साहजिकच त्याबाबत पोलीस दलाची भूमिका महत्वाची असणार आहे. त्यामुळे उगले यांच्यासाठी या निवडणूका पारदर्शक व विना वादाने पार पाडण्याचे आव्हान आहे. येणा-या काळात पोलीस दलात मोठ्या व महत्वाच्या पदावर आणखी काही फेरबदल होण्याचे संकेत मिळत आहेत. त्याची चर्चा वेगात सुरु आहे, मात्र त्याला आचारसंहितची आडकाठी आहे. लोकसभा निवडणूक झाल्यानंतरच काय त्या घडामोडी घडतील. त्यामुळे येणा-या काळात काय घडामोडी घडतात हे पाहणेच औत्सुकत्याचे आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव