शिंदाड ग्रा पं सदस्य बनले जलदूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 18:30 IST2019-05-13T18:30:18+5:302019-05-13T18:30:48+5:30
स्तुत्य : बोअरवेलने भागवताहेत अनेकांची तहान

शिंदाड ग्रा पं सदस्य बनले जलदूत
शिंदाड, ता.पाचोरा : येथे तीव्र पाणी टंचाई असून गावातील नळांना सुमारे १५ दिवसांनी पाणी येते. यामुळे ग्रामस्थांचे हाल होत असून येथील ग्रामपंचायत सदस्य हे गावकऱ्यांसाठी जलदूत बनले आहे. ते आपल्या खाजगी बोअरवेल वरून शेकडोंची तहान भागवत आहे.
आनंदा तेली यांनी वर्षभरापूर्वी घर बांधकामासाठी खाजगी बोरवेल केले व त्यास चांगले पाणी लागले आहे. दरम्यान सध्या गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून त्यांनी ग्रामस्थांचे हाल पाहता आपली बोरवेल खुली करून दिली आहे. या ठिकाणी रोज शेकडो नागरिक सकाळ पासून तर रात्री पर्यंत पाणी भरतात. या बोअरवेलचा नागरिकांना चांगल्या प्रकारे आधार मिळाला आहे. तेली यांच्या घराजवळ रोज महिला व मुले हे सकाळ पासून भांड्यांची रांग लावलेले दिसून येतात. बोअरवेलवर विद्युत मोटर यामुळे खूप वेळ चालत असली तरी तेली हे वीज बिलाची पर्वा करीत नाही. त्यांची पत्नी शांताबाई तेली या देखील कंटाळा न करता नागरिकांना आनंदाने पाणी देतात. या योगदानामुळे तेली दाम्पत्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान तेली यांचीबोअरवेल ही सुमारे १५० फूट खोल असून कितीही पाणी उपसा झाला तरी पाणी कमी होत नाही. परमेश्वराने त्यांना ही मोठी देणं दिल्याचे म्हटले जात आहे.