स्नेहाची शिदोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:17 IST2021-04-27T04:17:17+5:302021-04-27T04:17:17+5:30

कोरोना आव्हानात्मक परिस्थितीत गतवर्षाच्या एप्रिलपासून भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाउंडेशन आणि जैन इरिगेशन सिस्टीम लि. कंपनीद्वारा ‘स्नेहाची शिदोरी’ हा ...

Shidori of affection | स्नेहाची शिदोरी

स्नेहाची शिदोरी

कोरोना आव्हानात्मक परिस्थितीत गतवर्षाच्या एप्रिलपासून भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाउंडेशन आणि जैन इरिगेशन सिस्टीम लि. कंपनीद्वारा ‘स्नेहाची शिदोरी’ हा उपक्रम नियमितपणे सुरू आहे.

शहरातील कांताई सभागृहातून १ एप्रिल २०२० पासून आजपर्यंत दोन वेळचे सुमारे दहा लाखांच्यावर भोजन पाकिटे देण्यात आली.

यासाठी जवळपास ४० जणांचे सहकार्य घेऊन रोजच्या भोजननिर्मितीची क्रिया ठरली. जैन हिल्स येथे भोजन तयार करून ते शहरातील कांताई सभागृहात पोहोचविण्याची व्यवस्था केली जाते. सणासुदीला गरजू लोकांना गोड पदार्थही शिदोरीसोबत देण्यात आले. भगवान महावीर जयंतीला आमरस देण्यात आला. एका व्यक्तीला दिवसभरासाठी लागणारे सकस अन्न या स्नेहाच्या शिदोरीतून देण्यात आले. यात सकाळी चार पोळ्या, भाजी, चटणी, तर संध्याकाळी ४०० ग्रॅम खिचडी दिली जात आहे. जैन इरिगेशन सिस्टीम लि. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांचे व्यक्तीश: दक्षतापूर्वक लक्ष असते.

-भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाउंडेशन

Web Title: Shidori of affection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.