शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

‘शासन आपल्या दारी’च्या मंडपाखाली ‘पैशांचा खेळ चाले’! बिल सादर न करताही कार्यक्रमापोटी ५० लाखांचा निधी उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2023 21:19 IST

पाचोरा येथील कार्यक्रम आटोपून १० दिवस होत नाही तोच  आणि तिथल्या कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेल्या मंडपापोटी बिल सादर केले नसतानाही ५० लाखांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे.

कुंदन पाटील -जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात सुरु असलेल्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या मंडपाखाली जनतेच्या पैशांची उधळण सुरु असल्याची टीका होऊ लागली आहे. तशातच पाचोरा येथील कार्यक्रम आटोपून १० दिवस होत नाही तोच  आणि तिथल्या कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेल्या मंडपापोटी बिल सादर केले नसतानाही ५० लाखांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामुळे राज्य शासनाने सोयीच्या राजकारणासाठी जनतेच्या पैशांची उधळण सुरु केली असल्याची टीका आता राजकीय क्षेत्रात होऊ लागली आहे.

दि.१२ रोजी पाचोऱ्यात ‘शासन आपल्या दारी’ हा तालुकास्तरीय पहिला कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांचे तीनदा संभाव्य दौरे रद्द झाले. त्यामुळे दि.७ सप्टेंबर रोजीपासून टाकण्यात आलेला मंडप सलग ६ दिवस ‘जैसे थे’च होता. साहजिकच त्याचा भार राज्य शासनाच्या तिजोरीवर पडणार असल्याचे समीकरण निश्चीत झाले होते. तशातच मंगळवारी या कार्यक्रमासाठी असलेल्या मंडपाचे बिल अदा करण्यासाठी ५० लाखांचा निधी राज्य शासनाकडून प्राप्त झाला आहे. बिल सादर झाले नसतानाही आणि प्रशासकीय मान्यता मिळाली नसतानाही राज्य शासनाकडून वाटल्या जाणाऱ्या ‘खैराती’विषयी अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

जळगावसाठी ५० लाख तर....जळगाव येथे जिल्हास्तरीय शासन आपल्या दारी कार्यक्रम झाला होता. त्यासाठी तीन मोठे डोम उभारण्यात आले होते. त्यानंतर संबंधित तीन डोमपोटी सादर केलेल्या बिलापोटी १ कोटींच्या खर्चाला प्रशासनाने मंजुरी दिली होती. त्यापोटीही ५० लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. जळगावच्या कार्यक्रमातील डोमच्या तुलनेत पाचोऱ्यात एकमेव डोम उभारण्यात आला होता. तरीही डोमच्या बिलापोटी ५० लाखांचा निधी राज्य शासनाने सहजच उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे मंडपांआड ‘पैशांचा खेळ चाले’ अशा शब्दात विरोधकांनी आता टीका करायला सुरुवात केली आहे.

पाचोऱ्यातील कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेल्या मंडपाचे बिल अद्याप सादर करण्यात आलेले नाही. मात्र ५० लाखांचा निधी बॅंक खात्यात जमा झाला आहे.-भूषण अहिरे, प्रांताधिकारी, पाचोरा.

‘शासन आपल्या दारी’च्या नावाखाली पैशांची लूट सुरु आहे. या कार्यक्रमासाठी होणारा करोडांचा खर्च शेतकऱ्यांसाठी हितासाठी वापरला असता तर बरे वाटले असते. मात्र मुख्यमंत्र्यांनी समर्थकांसाठी सुरु केलेल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ‘लूट मोहिम’ सुरु केली आहे.-संजय सावंत, संपर्क प्रमुख, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) 

टॅग्स :State Governmentराज्य सरकारJalgaonजळगावEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना