घरासमोर पत्ते खेळणाऱ्यांना हटकल्याने डोक्यात घातले धारदार शस्त्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:12 IST2021-05-28T04:12:49+5:302021-05-28T04:12:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : घरासमोर पत्ते खेळून तेथेच लघुशंका करणाऱ्यांना जाब विचारल्याचा राग आल्याने राजू भगवान देशमुख (४२) ...

A sharp weapon was placed in the head of the card players in front of the house | घरासमोर पत्ते खेळणाऱ्यांना हटकल्याने डोक्यात घातले धारदार शस्त्र

घरासमोर पत्ते खेळणाऱ्यांना हटकल्याने डोक्यात घातले धारदार शस्त्र

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : घरासमोर पत्ते खेळून तेथेच लघुशंका करणाऱ्यांना जाब विचारल्याचा राग आल्याने राजू भगवान देशमुख (४२) यांना तिघांनी बेदम मारहाण करून डोक्यात लोखंडी रॉड टाकून गंभीर जखमी केल्याची घटना बुधवारी पिंप्राळा शिवारातील गिरणा पंपिंग रस्त्यावर घडली. याप्रकरणी गुरुवारी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तू कोळी, विक्की कोळी व भारत संजय सपकाळे (सर्व रा. गिरणा पंपिंग रोड) हे राजू देशमुख यांच्या घरासमोर पत्ते खेळताना, तेथेच वाहने लावतात व लघुशंका करतात. यामुळे त्रस्त झालेल्या देशमुख यांनी तिघांना जाब विचारला असता दत्तू व विक्की कोळी या दोघांनी देशमुख यांच्या पाठीवर लोखंडी रॉड मारला तर डोक्यात धारदार वस्तू मारून दुखापत केली. त्याचवेळी संजय सपकाळे याने डोक्यात बाटली मारली. यात जखमी झालेल्या देशमुख यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांनी रामानंद नगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. गुरुवारी सकाळी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास शिवाजी धुमाळ करीत आहेत.

Web Title: A sharp weapon was placed in the head of the card players in front of the house