शारदा प्राथमिक विद्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:22 IST2021-08-17T04:22:33+5:302021-08-17T04:22:33+5:30

शारदा प्राथमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष पंडीत अटाळे यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी संचालक शंकर ...

Sharda Primary School | शारदा प्राथमिक विद्यालय

शारदा प्राथमिक विद्यालय

शारदा प्राथमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष पंडीत अटाळे यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी संचालक शंकर पाटील, प्रमोद पाटील, मिना लोखंडे, रवींद्र अत्तरदे, हितेंद्र पाटील, मुख्याध्यापक गोविंदा लोखंडे, रवींद्र पाटील आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन शिवाजी पाटील यांनी केले तर यशस्वीतेसाठी संगीता पाचपांडे, दीपक पाटील, मनिषा चौधरी, ममता पाटील, सागर झांबरे, धनश्री नारखेडे, संजय घुगे, संजय सपकाळे, नितीन अटवाल, सुरेखा खैरनार, सुरेखा पाटील, यशवंत गुजर, लक्ष्मण जाधव, लक्ष्मण झोपे, हेमचंद्र इंगळे, नीलेश बोरोले आदींनी परिश्रम घेतले.

०००००००००००००००

खूबचंद सागरमल विद्यालय

खुबचंद सागरमल विद्यालयात संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष सांगोरे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक सतिष साळुंखे, नलिनी बोंडे, सुरेश आदीवाल आदींची उपस्थिती हाेती. सुभाष सांगोरे यांनी मार्गदर्शन केले. तर सूत्रसंचालन एल.एन.महाजन यांनी केले.

०००००००००००००

इम्पिरिअल इंटरनॅशनल स्कूल

पाळधी येथील इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल येथे शाळेचे अध्यक्ष नरेश चौधरी यांच्याहस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती सदस्य नंदलाल तिडके, प्राचार्य महेश कवडे, गजानन पाटील तसेच शिक्षक उपस्थित होते.

००००००००००००

जिजामाता माध्यमिक विद्यालय (फोटो)

जिजामाता माध्यमिक विद्यालय येथे भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण संस्थेचे अध्यक्ष डी.एल.महाले यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे ॲड. राजेंद्र वाघ, अरुण पाटील, अशोक भालेराव, मुख्याध्यापक राजेंद्र आर.खोरखेडे, शिक्षक संजय खैरनार, कृष्णा महाले, दिनेश सोनवणे, आशा पाटील, संगिता पाटील, विकास तायडे शिक्षकेत्तर कर्मचारी संजय पाटील, प्रशांत मडके, जगदीश शिंपी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन किशोर पाटील यांनी केले.

००००००००००००

जानकीबाई बाहेती विद्यालय (फोटो)

जानकीबाई आनंदरामजी बाहेती विद्यालयामध्ये संस्थेच्या अध्यक्षा उज्ज्वला बाहेती यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे संचालक सुरेश पाटील, शाम काेगटा, मुख्याध्यापक पी.आर.जाधव व शिक्षक उपस्थित होते.

Web Title: Sharda Primary School