शहरं
Join us  
Trending Stories
1
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
2
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
3
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
4
रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
5
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
6
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
7
"सरकारनं माझं ऐकलं नाही तर संसदेच्या छतावरून उडी मारेन"; जेव्हा राजकारणात दिसली धर्मेंद्र यांची 'शोले स्टाईल'
8
Women’s Kabaddi World Cup 2025: कबड्डीतही भारताच्या लेकी जगात भारी! सलग दुसऱ्यांदा जिंकली वर्ल्ड कप स्पर्धा
9
आधी कारने धडक, मग १९ सेकंदात १९ कुऱ्हाडीचे घाव; गुरुग्राममध्ये डिलिव्हरी बॉयवर जीवघेणा हल्ला!
10
आधुनिक तंत्रज्ञान, पूर्णपणे मेड इन इंडिया; भारतीय नौदलात ‘INS माहे’ची धमाकेदार एन्ट्री...
11
प्रेमात धोका! मिस कॉलने जोडले नाते, प्रियकराने तोडले! गर्भवती प्रेयसीचा गर्भपात करून स्टेशनवर सोडून पळाला
12
डॉ. गौरी गर्जे यांचा मृत्यू अनैसर्गिक; डॉक्टरांच्या खुलाशाने खळबळ, शवविच्छेदन अहवालात कोणत्या नोंदी?
13
"विश्वास ठेवा, दुसरा कुठलाही हेतू नाही" माओवाद्यांनी आत्मसमर्पणासाठी मागितली १५ फेब्रुवारीपर्यंतची वेळ
14
IND vs SA: टीम इंडियाच्या फलंदाजांची घसरगुंडी, दुसरीकडे करूण नायरची सूचक पोस्ट, म्हणाला...
15
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पती अनंत गर्जेंना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी, काल झालेली अटक
16
'३० कॉटेजचे एक आलिशान रिसॉर्ट बांधायचेच राहिले...'; बिझनेसमन धर्मेंद्रची शेवटची इच्छा होती...
17
महिंद्रा-टाटासह 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले! बाजारात अचानक का वाढला विक्रीचा दबाव?
18
दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला; अफगाणिस्तानातून आलेल्या विमानाची चुकीच्या रनवेवर लँडिंग
19
IND vs SA 2nd Test Day 3 Stumps : बावुमानं टीम इंडियाला फॉलोऑन देणं टाळलं; कारण...
20
नगरपरिषद निवडणूक होण्यापूर्वीच भाजपाच्या १०० सदस्यांची बिनविरोध निवड; विरोधकांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

vidhan sabha 2019 : जळगाव जिल्हा दौऱ्यादरम्यान शरद पवारांनी दिला धीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 18:45 IST

राजरंग ......

राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकताच दीड दिवसाचा जळगाव जिल्हा दौरा करुन कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये चैतन्य आणण्याचा प्रयत्न केला. या दौºयाने अनेक संकेत ते देऊन गेले आणि नेत्यांनी काय समजावे ते समजावे, असेही जणू त्यांनी सूचविले.जिल्ह्यात राष्टÑवादी काँग्रेसचे स्थिती बरी नाही. एकमेव आमदार या पक्षाचे आहेत. जिथे उमेदवारी दिली त्या मुक्ताईनगरातून स्वत: जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील यांनाच माघार घ्यावी लागली. त्यामुळे पक्षात संभ्रमाचे वातावरण असणे साहजिक आहे. जळगाव ग्रामीणमध्ये पक्षाच्या अधिकृत उमेदवार पुष्पा महाजन यांच्याविरुद्धच पक्षाचेच रवी देशमुख यांनी बंडखोरी केली आहे. त्यांनी प्रचारही सुरु केला आहे. जळगाव शहरातील पक्षाचे उमेदवार अभिषेक पाटील हे यापूर्वी जामनेरमधून लढण्याची तयारी करीत होते. त्यांना मात्र जळगाव शहरातून तिकिट द्यावे लागले. अशा विचित्र अवस्थेतून पक्ष जात आहे. त्यामुळे नेते आणि पदाधिकारीही संभ्रमावस्थेत होते. या अवस्थेत पक्षात चैतन्य आणण्याचे काम चाणाक्ष नेते आणि राष्टÑवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा ‘जाणता राजा’ असलेल्या शरद पवार यांनी केले.बुधवारी सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी नेत्यांचा उत्साह वाढविण्याचा प्रयत्न केला. राज्यात अनेक ठिकाणी काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेसच्या पदाधिकाºयांना सीबीआय आणि इडीचा धाक दाखवून भाजपात घेतले जात आहे. जळगाव जिल्ह्यातून कोणत्याही महत्वाचा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पक्षांतर केले नाही, ही समाधानाची बाब असल्याचे पवार यांनी सांगून जणू आहे त्या पदाधिकाºयांना शाबासकीची थाप दिली.दुसरीकडे पारोळ्याची सभा आटोपून पवार हे मंगळवारी रात्री जळगावात पोहचले. जळगावात आल्यावर ते थेट जैन हिल्स येथे मुक्कामाला गेले. तिथे पोहोचताच त्यांनी सोबत असलेल्या पदाधिकाºयांना थकव्यामुळे आता घरी जाण्याविषयी सल्ला दिला. यानंतर पवार यांनी जिल्ह्यातील अनेक जुन्या कार्यकर्त्यांना फोनवर संपर्क साधून माहिती घेतल्याचे समजते.. पवार यांच्या या फंड्याचा अनेकांनी अनुभव घेतला आहे. पवारांची ही खासियत म्हणावी.एकेकाळी जिल्ह्यात काँग्रेसचे मोठे प्रस्थ होते. पक्षाच्या अनेक नेत्यांनी राज्यस्तरावर नेतृत्व केले आहे. अनेक नेत्यांनी मंत्रीपदे भूषविली आहेत. आज या पक्षाची स्थिती असून नसल्यासारखी झाली आहे. शिरीष चौधरी हे एकमेव उमेदवार रावेरमधून रिंगणात आहेत. तिथे आजी- माजी आमदारांची लढाई आहे.पहिल्यांदा लढणाºयांची नवलाईइकडे जिल्ह्यात पहिल्यांदा लढणारे उमेदवार माजी आमदारांशी लढत देत आहेत. त्यात चोपडा येथील शिवसेनेच्या लता सोनवणे यांच्याविरुद्ध राष्टÑवादी काँग्रेसचे माजी आमदार जगदीश वळवी यांच्याशी लढत आहे. तर चाळीसगावात भाजपचे मंगेश चव्हाण यांच्याविरुद्ध राष्टÑवादीचे माजी आमदार राजीव देशमुख यांच्यात लढत होत आहे. तिकडे मुक्ताईनगरात शिवसेनेचे बंडखोर चंद्रकांत पाटील यांना निवडणुकीत यश मिळाले नसले तरी यावेळी त्यांचीही लढत रोहिणी खडसे - खेवलकर यांच्याशी आहे. भुसावळातही भाजपाचे आमदार संजय सावकारे यांची लढत असलेले राष्टÑवादी आघाडीेचे जगन सोनवणे यांच्याशी आहे. इथे भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी अपक्ष उमेदवार डॉ. मधू मानवतकर यांना पाठिंबा देऊन निवडणुकीतील चुरस वाढविली आहे.इकडे जळगाव ग्रामीण मतदार संघातही सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरुद्ध राष्टÑवादीच्या उमेदवार पुष्पा महाजन यांच्यात लढत होत आहे. त्यामुळे आता चुरस आणखीनच वाढली आहे. कोण बाजी मारणार हे आता येणारा काळच सांगणार आहे.- चुडामण बोरसे

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव