शरद पवार, मुख्यमंत्र्यांसह अर्धा डझन आजी माजी मंत्री 29 रोजी चोपडय़ात

By Admin | Updated: May 13, 2017 19:16 IST2017-05-13T19:16:02+5:302017-05-13T19:16:02+5:30

29 मे रोजी सकाळी 10 वाजता चोपडा येथे येणार आहेत.

Sharad Pawar, the former minister, half a dozen grandmothers including Chief Minister Chopadey on 29th | शरद पवार, मुख्यमंत्र्यांसह अर्धा डझन आजी माजी मंत्री 29 रोजी चोपडय़ात

शरद पवार, मुख्यमंत्र्यांसह अर्धा डझन आजी माजी मंत्री 29 रोजी चोपडय़ात

ऑनलाइन लोकमत

चोपडा, जि. जळगाव, दि. 13 - माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यासह अर्धा डझन आजी-माजी मंत्री  29 मे रोजी सकाळी 10 वाजता चोपडा येथे येणार आहेत.
   विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांचा  11 जून रोजी अमृत महोत्सवी वाढदिवस आहे. त्यानिमित्त तसेच येथील चोपडा पीपल्स बँकेच्या अमृत महोत्सवानिमित्त हे सर्व आजी माजी  मंत्री  29 मे रोजी चोपडय़ात येणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी कळविले आहे. 

Web Title: Sharad Pawar, the former minister, half a dozen grandmothers including Chief Minister Chopadey on 29th