पंढरपूरच्या विठोबाला शेंदुर्णीचा चंदन लेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 04:20 PM2018-04-29T16:20:35+5:302018-04-29T16:20:35+5:30

चंदन पेस्ट मशीनद्वारे तयार होतो प्रती दिन तीन किलो चंदनाचा लेप; कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिर संस्थानकडून आॅर्डर

Shandurni Chandan Lep of Pandharpur Vithoba | पंढरपूरच्या विठोबाला शेंदुर्णीचा चंदन लेप

पंढरपूरच्या विठोबाला शेंदुर्णीचा चंदन लेप

googlenewsNext
ठळक मुद्देम्हैसूरच्या चंदनासाठी शेंदुर्णीचे मशीनमहालक्ष्मी संस्थानकडून विचारणानवनिर्मितीच्या ध्यासातून संशोधनाकडे

विलास बारी ।
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.२९ : महाराष्ट्रातील वारकऱ्यांचे दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठोबाची मूर्र्ती शीतलीकरणासाठी शेंदुर्णी (ता. जामनेर, जि.जळगाव) येथील सुभाष जगताप यांनी तयार केलेल्या चंदन पेस्ट मशिनचा वापर केला जात आहे. यासाठी त्यांनी खास चंदन पेस्ट यंत्र तयार केले आहे. याद्वारे प्रती दिन अडीच ते तीन किलो चंदनाचा लेप तयार करून मूर्ती शीतलीकरणाची प्रक्रिया केली जात आहे. पंढरपूरनंतर आता कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिर संस्थाननेदेखील या चंदन पेस्ट मशिनची आॅर्डर बुक केली आहे.
शेंदुर्णी हे महानुभाव पंथीय बांधवांचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी दत्त स्वामी यांचे ठाणे आहे. उटी उपचार करण्यासाठी चंदनाची लाकडे हाताने घासून तयार झालेला लेप दत्त स्वामी यांच्या ठाण्याजवळ लावला जातो. चंदनाचा लेप तयार करण्यासाठी मोठीच कसरत करावी लागत असल्याने येथील विश्वस्तांनी सचिन जगताप यांच्याशी संपर्क साधत एखादी यंत्र तयार करता येईल का? अशी विचारणा केली. जगताप यांनी अवघ्या काही दिवसात हे यंत्र तयार करून दिले.
दहा कर्मचाºयांचे काम अडीच तासात
वैशाख वणव्याची दाहकता कमी करण्यासाठी विठुरायाला परंपरागत चंदन उटी पूजेलाही सुरुवात होते. त्यासाठी रोज दहा कर्मचाºयांना तासन्तास चंदन उगाळावं लागत होतं. देवाच्या रोजच्या चंदन उटी पूजेसाठी ७५० ग्रॅम उगाळलेल्या चंदनाची आवश्यकता असते. यात केशर मिसळण्यात येतं. यापूर्वी हे चंदन उजळण्यासाठी दहा कर्मचारी सलग चार महिने हे काम करत असत.
म्हैसूरच्या चंदनासाठी शेंदुर्णीचे मशीन
शीतल चंदनाचा लेप विठुरायाच्या संपूर्ण अंगाला लावण्यात येतो. लेपनासाठी खास म्हैसूरहून उच्च दर्जाचे चंदन मागवण्यात येते. चैत्र शुद्ध द्वितीयेपासून मृग नक्षत्रापर्यंत ही चंदन उटीची पूजा होते. विठुरायाला रोज दुपारच्या पोशाखावेळी लावलेली ही चंदन उटी दुसºया दिवशी काढण्यात येते.
महालक्ष्मी संस्थानकडून विचारणा
जगताप यांनी चंदन पेस्टचे यंत्र तयार केल्यानंतर ते कशा पद्धतीने काम करते याचा व्हिडिओ तयार करून यू ट्यूबवर अपलोड केला. या यंत्राबाबत माहिती मिळाल्यानंतर कोल्हापूर येथील महालक्ष्मी संस्थानकडून या यंत्राबाबत विचारणा झाली. यासोबतच अहमदाबाद येथील नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन तसेच नागपूर व फलटण येथून आॅर्डर नोंदविण्यात आली आहे.


नवनिर्मितीच्या ध्यासातून संशोधनाकडे
शेंदुर्णी येथील सुभाष वसंतराव जगताप हे अवघे सातवी उत्तीर्ण आहेत. त्यांनी सायकलवरील कोळपणी यंत्र आणि फवारणी पंप तयार केले. याबद्दल त्यांचा तत्कालीन राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या हस्ते दिल्ली येथे सन्मान झाला होता. या पुरस्कारातून प्रेरणा घेत त्यांचे पुत्र सचिन जगताप यांनी भिलावा फोडण्याचे मशीन तयार केले. या संशोधनाला तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला होता.
काही दिवसांपूर्वी सिनेअभिनेता अक्षय कुमार याने जगताप यांच्या लघुउद्योगाच्या विस्तारासाठी पाच लाखांची मदत देऊन सन्मानित केले होते. सचिन यांचे लहान बंधू स्वप्नील यांनी आॅटोमोबाइल इंजिनिअरिंग करीत वडील व भाऊ यांच्या नवनिर्मितीच्या प्रयत्नांना हातभार लावला आहे.

आपण केवळ १२ वी पास आहोत. मात्र नवनिर्मितीचा ध्यास असल्याने चंदन पेस्टसारखी कमी श्रमाच्या आणि कमी किमतीच्या वेगवेगळ्या मशीन तयार करीत आहोत. आगामी काळात काजू कटिंग मशीन तयार करण्याचा मानस आहे.
-सचिन सुभाष जगताप, शेंदुर्णी

Web Title: Shandurni Chandan Lep of Pandharpur Vithoba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.