कळमसरे येथे शॉक लागून महिलेचा जागीच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2017 13:28 IST2017-07-07T13:28:07+5:302017-07-07T13:28:07+5:30
मारवड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद

कळमसरे येथे शॉक लागून महिलेचा जागीच मृत्यू
>ऑनलाईन लोकमत
कळमसरे,ता.अमळनेर, दि.7- विजेचा शॉक लागल्याने सिंधुबाई दयाराम कुंभार (52) या महिलेचा शुक्रवारी सकाळी 8 वाजता जागीच मृत्यू झाला.
गावातील शारदा हायस्कुलसमोरील शहापुर रस्त्यालगत झोपडी वजा घरात सिंधुबाई कुंभार पतीसह राहतात. सकाळी नळांना पाणी आले. विद्युत पंपाच्या साह्याने त्यांनी पाणी भरले. त्यानंतर विद्युत पंपाला लावलेली इलेक्ट्रीक पीन काढत असतांना, त्यांना शॉक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
सिंधुबाईंचे पती आजारी असून, मोलमजुरी करून त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होत्या. अनिल कुंभार यांनी दिलेल्या खबरीवरून मारवड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पती, विभक्त मुलगा, सून असा परिवार आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.