शाहूनगरात तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:15 IST2021-03-20T04:15:27+5:302021-03-20T04:15:27+5:30

जळगाव : पत्नीकडे का बघतो, याचा जाब विचारल्याच्या कारणावरून तिघांनी नाजिम अब्दुल रशीद (रा.शाहूनगर ) या तरुणाला बेदम ...

In Shahunagar, a youth was beaten with an iron rod | शाहूनगरात तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण

शाहूनगरात तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण

जळगाव : पत्नीकडे का बघतो, याचा जाब विचारल्याच्या कारणावरून तिघांनी नाजिम अब्दुल रशीद (रा.शाहूनगर ) या तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना शाहुनगरात १७ मार्च रोजी रात्री ८ वाजता घडली. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील शाहूनगर परिसरात नाजिम अब्दुल रशिद हा पत्नीसह वास्तव्याला आहे. त्याच भागातील सादीक याकूब शेख, कल्लू याकुब शेख, शाहिद याकूब शेख (सर्व रा. शाहूनगर) हे बुधवारी वाईट नजरेने नाजीमच्या पत्नीकडे पाहत होते. पत्नीकडे का बघतो, असा जाब नाजिम याने विचारला. या राग आल्याने तिघांनी त्यास शिवीगाळ करून लोखंडी रॉडने उजव्या हाताला, कमरेला, पाठीला बेदम मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाला. अखेर नाजिम रशीद यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात सादिक शेख, कल्लू शेख, शाहीद शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक भूषण जैतकर करीत आहेत.

Web Title: In Shahunagar, a youth was beaten with an iron rod