लैंगिक अत्याचार पीडित मुलीने संपवले स्वतःचे आयुष्य
By Admin | Updated: January 3, 2017 13:40 IST2017-01-03T13:40:16+5:302017-01-03T13:40:16+5:30
रावेर येथील एका लैंगिक अत्याचार पीडित अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

लैंगिक अत्याचार पीडित मुलीने संपवले स्वतःचे आयुष्य
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 3 - रावेर येथील शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील लैंगिक अत्याचार पीडित अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 31 डिसेंबर रोजी मुलीला पळवून आरोपीने तिच्यावर स्वतःच्या राहत्या घरी लैंगिक अत्याचार केले व त्यानंतर जीवे मारण्याची धमकी दिली. झाल्या प्रकारावरुन समाजात बदनामी होण्याच्या भीतीपोटी पीडित मुलीने शेतातील झाडावर गळफास घेऊन रविवारी आत्महत्या केली होती.
पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर अकस्मात मृत्यूच्या तपासात लैंगिक अत्याचार करुन व धमकी देऊन आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तरुणास पोलिसांनी अटक केली आहे.
अटक केलेला आरोपी हा मोरव्हाल येथील रहिवासी व पाल येथील शासकीय वसतिगृहात वास्तव्यास होता. टी.वाय.बी. ए.चा विद्यार्थी असलेला आरोपी सलीम ईस्माइल तडवीने पीडित मुलीला वसतिगृहाजवळून पळवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.