शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

नदीकाठावरील गावांचे सांडपाणी वाघूर धरणात

By admin | Updated: April 25, 2017 00:25 IST

जळगाव, जामनेरकर पिताहेत दूषित पाणी : कांग व वाघूर नद्या बनल्या प्रदूषित, सांडपाण्याच्या निच:याची सोयच नाही

लियाकत सैयद/ मोहन सारस्वत ल्ल जामनेरजामनेर येथील कांग नदीपात्रातील दूषित पाणी तसेच तालुक्यातील नेरी, हिवरखेडे, गारखेडे आदी गावांचे सांडपाणी सुयोग्य निचरा होण्याच्या सोयीअभावी वाघूर धरणात जाऊन मिसळत असल्याने धरणाचे पाणी दूषित होत आहे व हेच पाणी जळगाव, जामनेर शहरासह तालुक्यातील सुमारे दहा गावांना पिण्यासाठी पुरविले जात आहे. ज्या ठिकाणी जलशुद्धीकरणाची  सोय  आहे त्या ठिकाणी किमान पाणी शुद्ध करून पुरवठा होतो, मात्र ज्या गावात शुद्धीकरणाची यंत्रणाच नाही त्या गावांना दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात आल्याची तक्रार करण्यात येत आहे. जामनेर येथे  सहा महिन्यांपासून कांग नदीचे पात्र कोरडे असून,  पात्रात शहरातील विविध भागातील गटार व नाल्याचे दूषित  पाणी सोडले जाते व हेच पाणी पुढे वाघूर धरणात जाऊन मिळते. अशीच स्थिती नेरी, हिवरखेडे व गारखेडे या गावांची आहे. वास्तविक जामनेर पालिकेने शहरातील गटार व नाल्यातून वाहणारे दूषित पाणी नदीपात्रात न सोडता इतरत्र वळविणे गरजेचे होते. मात्र तसे न केल्याने  हेच  पाणी पुढे वाघूर धरणात जाऊन मिळते. धरणक्षेत्राच्या अधिका:यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे दूषित  पाण्याची ही समस्या वाढली आहे. नेरी बुद्रूक व पहूरपेठ ही दोन्ही गावे वाघूर काठावर वसलेली असून त्यांची लोकसंख्यादेखील जास्त आहे. या  गावांच्या ग्रामपंचायतींच्या दुर्लक्षामुळे गावातील गटारी व शौचालयाचे घाण पाणी नदीपात्रात येत असल्याने हेच घाण पाणी पुढे वाघूर धरणात जाऊन मिसळते, असे नागरिकांचे म्हणणे आहे.दरम्यान, जामनेर शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहणारी कांग नदी ही पावसाळ्याचे 4 महिने प्रवाही असते, त्यानंतर ती कोरडी पडते. त्यात शहरातील सांडपाणी मोठय़ा प्रमाणात वाहून येऊन ते डबक्याच्या रूपाने पात्रात साचलेले असते व हेच पाणी पुढे वाघूर धरणाच्या बॅकवॉटरला जाऊन मिळत असल्याने धरणातील पाणी दूषित होत असते. तसेच नदी पात्रात काटेरी झाडेदेखील वाढलेली आहेत. पालिकेने दूषित  पाणी इतरत्र वळविण्याचे व नदीपात्र स्वच्छतेसाठी उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.सात लाख लोकसंख्या पितेय वाघूरचे पाणीएमआयडीसी वगळता जळगावसह जामनेर शहर व तालुक्यातील शिंगाईत, खांदगाव, डोहरी, नेरी बुद्रूक, नेरी दिगर, गाडेगाव, रोटवद, पळासखेडे (मि)े, मोहाडी, हिवरखेडे बुद्रूक, करमाड व मोरगाव. तसेच  वराडसीम ता. भुसावळ व काही गावांतील जनता वाघूर धरणाचे पाणी पिते. सुमारे सात लाख लोकसंख्या वाघूर धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहे. सांडपाणी मिश्रित हे पाणी ही जनता पित आहे. गेल्या महिन्यापासून जळगाव शहरात दरुगधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत असल्याची सार्वत्रिक ओरड आहे. त्याचे हे एक कारणही असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.वाघूर धरणाचे बॅकवॉटर हिवरखेडे बुद्रूक गावार्पयत पोहचले असून येथील गटार व शौचालयाचे घाण पाणी थेट त्यात जाते, परिणामी धरणाचे पाणी दूषित होत आहे.  या गंभीर प्रकाराकडे हिवरखेडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. याबाबत सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवकांशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.4नेरी बुद्रूक व नेरी दिगर ही दोन्ही गावे वाघूर काठावर वसलेली असून लोकसंख्या सुमारे 20 हजारांच्या जवळपास आहे, मात्र गावातील सांडपाण्याचा निचरा करणारी कोणतीही व्यवस्था नसल्याने सांडपाणी थेट वाघूर नदीपात्रातच साचते आणि पुढे वाहत जाते.काय म्हणतात, धरणावरील अभियंताकांग व वाघूर नदी काठावरील गावांनी दूषित पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होण्यासाठी यंत्रणा राबवावी, तसेच आपल्या गावातील ग्रामस्थांना शुद्ध पाणी पुरविणेसाठी जलशुद्धीकरण केंद्रे सुरू करावे, या व्यतिरिक्त आम्ही काय करणार ?-सी.के. पाटील, सहायक, अभियंता, वाघूर धरण विभाग, जळगाव.‘वाघूर नदीपात्रात पहूरपेठ ग्रामपंचायतीने ठिकठिकाणी शोषखड्डे निर्माण केले असून गावातील गटारीचे पाणी त्यात सोडले जाते, त्यामुळे आमच्या गावातील दूषित पाणी वाघूर धरणात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.-प्रदीप लोढा, सरपंच, पहूरपेठ ग्रामपंचायत ‘नेरी गावातील सांडपाणी सध्या वाघूर नदीपात्रात तुंबलेले आहे. जून महिन्यापूर्वी गावातील सांडपाणी बाजार पट्टय़ाजवळ मोठा शोषखड्डा बांधून त्यात सोडण्याची योजना आहे.-राजश्री रवींद्र पाचपोळे, सरपंच, ग्रामपंचायत नेरी बुद्रूक.‘सध्या जामनेर शहरातील सर्व सांडपाणी कांग नदीपात्रात जात असले तरी भविष्यात भुयारी गटार योजना पूर्ण झाल्यावर सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी शेतीसाठी वापरण्यात येणार आहे.                                                  -शोभा बाविस्कर, मुख्याधिकारी, नगरपरिषद, जामनेर.