श्रमदानातून तयार केला सातशे मीटर शेतरस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 01:10 AM2019-01-23T01:10:24+5:302019-01-23T01:12:23+5:30

अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाच्या राष्टÑीय सेवा योजनेच्या शिबिरप्रसंंगी १२५ स्वयंसेवकांनी श्रमदानातून तब्बल ७०० मीटर लांबीचा रस्ता तयार करून शेतकऱ्यांची गैरसोय दूर केली आहे.

 Seventh meter shorts made from labor | श्रमदानातून तयार केला सातशे मीटर शेतरस्ता

श्रमदानातून तयार केला सातशे मीटर शेतरस्ता

googlenewsNext
ठळक मुद्देअंतुर्ली- रंजाणे येथे स्तुत्य उपक्रमगावकºयांकडून स्वयंसेवकांचे कौतुक

अमळनेर : आजच्या तरुणांमध्ये मोबाईलचे फारच वेड असते व ते समाजापासून दूर असतात अशी सर्वांची नेहमी तक्रार असते. परंतु तरुणाईचे समाजोपयोगी कार्यही दखल घेण्याजोगे असते, याचा वस्तूपाठ प्रताप महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी घालून दिला आहे. आपल्या श्रमदानातून तब्बल सातशे मीटर लांबीचा शेतरस्ता तयार करून देऊन त्यांनी शेतकºयांची मोठी गैरसोय दूर केली आहे.
इतर तरुणांना प्रेरणा देणारे कार्य हे तालुक्यातील अंतुर्ली- रंजाणे येथे झालेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी शिबिरात झाले. यात १२५ स्वयंसेवकांनी ग्रामसहभागातून तब्बल ७०० मीटर उपरस्ता तयार करून पावसाळ्यात शेतात जाणाº्या शेतकºयांसाठी महत्वाची सोय निर्माण करून दिली आहे.
याबाबतीत गावकºयांनी आनंद व्यक्त करत सर्व स्वयंसेवकांचे स्वागत केले. या श्रमदान कार्यप्रसंगी प्रा. भरत पाटील यांनी मार्गदर्शन केले, कार्यक्रम अधिकारी नीलेश पवार यांनी श्रमदानाची आखणी केली. प्रा. अवींत पाटील यांनी स्वयंसेवकांचे गट तयार करून देखरेखीचे काम पाहिले. प्रा. वृषाली वाकडे यांनी श्रमदानातून होणाºया दुखापतींवर औषधोपचार केले. तर सिनीयर विद्यार्धी तुषार पाटील व त्याच्या गटाने नाश्त्याची सुविधा कामाच्या ठिकाणी पुरविली. गावच्या सरपंच शीतल पाटील, उपसरपंच व मान्यवर ग्रामपंचायत सदस्य यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. सर्व स्वयंसेवकांनी या श्रमदानात खूप मेहनत घेऊन तरुणाईतील जल्लोष दाखवला.

 

Web Title:  Seventh meter shorts made from labor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.