दरड कोसळून बर्डी आश्रमशाळेतील सात विद्यार्थी जखमी

By Admin | Updated: October 11, 2015 00:47 IST2015-10-11T00:47:04+5:302015-10-11T00:47:04+5:30

शासकीय आश्रमशाळेत शनिवारी पुन्हा दरड कोसळून सात विद्यार्थी जखमी झाल्याची घटना घडली.

Seven students injured in Baddi ashram school | दरड कोसळून बर्डी आश्रमशाळेतील सात विद्यार्थी जखमी

दरड कोसळून बर्डी आश्रमशाळेतील सात विद्यार्थी जखमी

तळोदा : बर्डी, ता.अक्कलकुवा येथील शासकीय आश्रमशाळेत शनिवारी पुन्हा दरड कोसळून सात विद्यार्थी जखमी झाल्याची घटना घडली. या सातपैकी पाच जणांची प्रकृती गंभीेर असून त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या आश्रमशाळेत पुढील आठवडय़ात मैदानी स्पर्धा होणार आहेत. त्यासाठी मैदान तयार करण्याचे काम सुरू आहे. हे काम विद्याथ्र्याकडून केले जात होते. त्यासाठी लागणारी माती जवळच्या डोंगरावरून आणण्यासाठी विद्यार्थी गेले असता तेथे अचानक दरड कोसळली. त्याखाली सात विद्यार्थी दाबले गेल्याने जखमी झाले.

याबाबत पालकांमध्ये आश्रमशाळा प्रशासनविरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. जखमींपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे.

जखमींची नावे

मनोहर वाण्या वसावे (इयत्ता आठवी)

रंजना होमा तडवी (इयत्ता सातवी),

विकास धनजी तडवी (इयत्ता आठवी),

दारासिंग दोह:या राऊत (इयत्ता पाचवी),

शिल्पा गोमा राऊत (इयत्ता सातवी)

हीना रोडत्या पाडवी (सातवी, रा.बर्डी).

गणेश पुन्या तडवी (आठवी, रा. वेहगी)

Web Title: Seven students injured in Baddi ashram school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.